पुण्यात लेखी परीक्षेत तोतयागिरी; दोन वेगवेगळे गुन्हे दाखल

पुण्यात लेखी परीक्षेत तोतयागिरी; दोन वेगवेगळे गुन्हे दाखल

बीआरओ विभागाच्या भरतीसाठी घेतलेल्या लेखी परीक्षेत तोतयागिरी

marathinews24.com

पुणे – लष्कराच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) विभागाच्या भरतीसाठी घेतलेल्या लेखी परीक्षेत तोतयागिरी करून दुसऱ्याच्या नावाने परीक्षा दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राज्याच्या औद्योगिक धोरणावर जागतिक पातळीवरील विश्वास अधिक बळकट-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भैरवनगर येथील ग्रेफ सेंटर, बीआरओ येथे वर्ग-३ पदांसाठी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेदरम्यान काही जणांनी दुसऱ्या उमेदवारांच्या नावाने डमी उमेदवार बसवून परीक्षा दिल्याचे आढळून आले. या प्रकारामुळे सरकारची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी भा.न्या.सं. कलम ३१८(२) आणि ३१९(२) अंतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत. तपासात परीक्षेदरम्यान काही उमेदवारांच्या जागी इतरांनी बसून लेखी परीक्षा दिल्याचे समोर आले. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, परीक्षेच्या प्रक्रियेत नेमका कसा गैरप्रकार झाला याचा शोध घेत आहेत. तसेच संबंधित परीक्षाकेंद्रातील कागदपत्रे आणि नोंदींचीही चौकशी करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×