नागरिकांच्या सोयीसुविधासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी करा; नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ
marathinews24.com
पुणे – राज्यशासनाकडून विकास आराखड्यांना मंजुरी दिली आहे. आगामी काळात उर्वरित विकास आराखड्यांना मंजुरी देण्याचे काम करण्यात येईल. नगर विकास आराखडा तयार करताना स्वछता, पाणीपुरवठा, वाहतूक, पर्यावरण, प्रदूषण, स्वछता, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण, झोपडपट्टी पुनर्वसन आदी बाबीचा समावेश करण्यात येतो. नागरिकांना पायाभूत सुविधा मिळण्याकरीता या मंजूर विकास आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे.
शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी
आगामी काळात या विकास आराखड्यात ‘अर्बन डिझायनिंग’ या संकल्पनेचाही समावेश केला पाहिजे. स्वच्छ आणि सुंदर शहर विकसित करण्याकरीता अतिक्रमणे, अनाधिकृत बांधकाम आणि जाहिरात फलकांची उभारणी होणार नाही,याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या करण्याकरीता स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांनी समन्वयांनी काम केले पाहिजे, असे मत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली १०० दिवस उपक्रमाअंतर्गत नगर विकास विभागाच्या नियोजन करण्यात आले आहे, यामध्ये नगर विकासाची विविध कामे करताना ती वेळेत पुर्ण झाली पाहिजेत, येणाऱ्या अडचणींवर मात करता आली पाहिजे, यामुळे आगामी काळात विविध प्रकल्प मार्गी लावून नागरिकांना सोई-सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही मिसाळ यांनी सांगितले.
डॉ. करीर प्रास्ताविकात म्हणाले, वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे उद्भवणाऱ्या शहरी समस्यांवर विचारमंथन करणे आणि त्यांचे निराकरण शोधणे हा या परिसंवादाचा उद्देश आहे. शहरीकरणाचे फायदे, शहरीकरणाचे अर्थशास्त्र आणि वाढती लोकसंख्या तसेच पायाभूत सुविधांवरील दबाव यांसारख्या आव्हानांना सामोरे जातांना नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेवर चर्चा करणे हा उद्देश असल्याचे स्पष्ट केले
स.गो. बर्वे हे पुण्याचे माजी प्रशासक आणि महानगरपालिका आयुक्त होते. त्यांना एक प्रतिष्ठित सनदी अधिकारी म्हणून गौरवण्यात येते. त्यांनी नियोजन आयोगाचे सदस्य म्हणूनही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, विशेषतः गृहनिर्माण आणि प्रशासकीय सुधारणांवरील अहवालांद्वारे त्यांनी मोलाची भूमिका बजावली.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स.गो. बर्वे ट्रस्टच्या संकेतस्थळाचे अनावरण केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जम्मू काश्मिर येथील पहलगम येथे मृत्यू झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली. आभार महानगर पालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी मानले.