Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

खडकीत विद्यार्थ्यांसाठी आधुनिक स्वच्छतागृहाचे उद्घाटन

खडकीत विद्यार्थ्यांसाठी आधुनिक स्वच्छतागृहाचे उद्घाटन

विद्यार्थ्यांच्या आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने तसेच आरोग्यदायी वातावरणात शिक्षण घेण्यास मदत

marathinews24.com

पुणे – देसाई ब्रदर्स लिमिटेड व वनराई संस्थेच्या संयुक्त विद्यमाने खडकी शिक्षण संस्था तसेच सी. के. गोयल व टीकाराम जगन्नाथ कनिष्ठ महाविद्यालय, खडकी येथे विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या नवीन अद्ययावत स्वच्छतागृहाचे उद्घाटन करण्यात आले.

अखिल भारतीय पाली साहित्य संमेलन २२ मार्च रोजी पुण्यात – सविस्तर बातमी 

विद्यार्थ्यांच्या आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने या उपक्रमांतर्गत मुला व मुलींसाठी स्वतंत्र, सुरक्षित आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज स्वच्छतागृहे उभारण्यात आली आहेत. या सुविधेमुळे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजा सुलभ होऊन त्यांना अधिक आरोग्यदायी वातावरणात शिक्षण घेण्यास मदत होणार आहे.

उद्घाटन समारंभास खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, देसाई ब्रदर्स लिमिटेडचे सीएसआर प्रमुख चंद्रकांत रावळ, वरिष्ठ व्यवस्थापक निलेश गुजराथी, वनराई संस्थेचे सचिव अमित वाडेकर, उपमुख्याध्यापक राजेंद्र लेले, शिक्षकवर्ग तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा सुविधा अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे सांगितले. सामाजिकदृष्ट्या उपयुक्त प्रकल्पांमुळे शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळत असल्याचे मतही उपस्थितांनी व्यक्त केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×