Breking News
Pune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळा

पुण्यात रंगणार भारतातील सर्वात मोठी तंत्रज्ञान स्पर्धा

पुण्यात रंगणार भारतातील सर्वात मोठी तंत्रज्ञान स्पर्धा

रोबोटेक्स इंडिया स्पर्धेचे आयोजन

marathinews24.com

पुणे – तंत्रज्ञान, सर्जनशीलता आणि नवोन्मेषाचा भव्य उत्सव म्हणून रोबोटेक्स इंडिया नॅशनल चॅम्पियन येत्या २० आणि २१ सप्टेंबर रोजी पुण्यातील MIT-ADT विद्यापीठ, लोणी काळभोर येथे रंगणार आहे. देशभरातून ७ हजारांहून अधिक विद्यार्थी आणि ५०० हून अधिक रोबोट्सच्या सहभागाने ही स्पर्धा यंदा ऐतिहासिक ठरणार आहे. शासकीय शाळा, खाजगी संस्था तसेच वंचित समाजघटकातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे, यावर्षीच्या स्पर्धेत ग्रामीण आणि आदिवासी भागातील ५० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी सहभागी होत असल्याने STEM आणि रोबोटिक्स शिक्षणाला खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक व्यासपीठ मिळाले आहे.

अनुसूचित जाती कल्याण समितीचा पुणे जिल्हा दौरा – सविस्तर बातमी 

दोन दिवसीय या महोत्सवात लाईन फॉलोअर, मेझ सॉल्व्हर, मिनी सुमो, ड्रोन एव्हिएशन, फोल्क रेस तसेच बहुचर्चित एंटरप्रेन्युअरशिप चॅलेंज अशा विविध रोमहर्षक स्पर्धांचा समावेश आहे. १२ लाख रुपयांपर्यंत पारितोषिक निधी असलेल्या या स्पर्धेत विजेत्यांना केवळ पदक आणि ट्रॉफीच नव्हे, तर युरोपातील एस्टोनियामध्ये होणाऱ्या २०२५ च्या रोबोटेक्स इंटरनॅशनल चॅम्पियनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

रोबोटेक्स इंडिया ही केवळ स्पर्धा नाही तर विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचा उत्सव आहे. गाव, शहर, खेड्यातील मुले तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जेव्हा समस्यांचे निराकरण करतात, तेव्हा ‘विकसित भारत’ घडण्याचे दर्शन घडते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर आणि डिजिटल भारताच्या दृष्टीकोनाशी सुसंगत राहून, ही स्पर्धा भारताच्या तरुण नवोन्मेषकांना जागतिक स्तरावर घेऊन जाण्याचे काम करते,” असे रोबोटेक्स इंडियाच्या संचालिका पायल राजपाल यांनी सांगितले. या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे “Girls Who Build Robots” या उपक्रमाद्वारे हजारो मुलींना STEM क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×