Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

घरफोडी करणार्‍या सराईताला अटक

बाणेर पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – शहरातील उच्चभू्र असलेल्या बाणेर परिसरात घरफोडी करणार्‍या सराईताला अटक करण्यात बाणेर पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून सोन्याचे दागिने, ५० हजारांची रोकड असा ऐवज जप्त केला आहे. चेतन उर्फ चेत्या काकासाहेब वाघमारे (वय २७ रा. विजयनगर, काळेवाडी ) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. यापुर्वी त्याचे साथीदार साहील रविंद्र वाघमारे (वय २३ रा. हरदेव कॉलनी विजय नगर, काळेवाडी ) शाकिब छोटू शेख (वय २६ रा. संजय गांधीनगर काळेवाडी) यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या.

ओतूर परिसरातील सात वर्षीय बालिकेवरील अमानुष अत्याचार – सविस्तर बातमी

बाणेरमधील वीरभद्रनगरात चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करीत सोन्याचे दागिने, रोकड चोरून नेल्याची घटना ८ सप्टेंबरला घडली होती. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी तातडीने तपास करीत सीसीटीव्ही फुटेजद्वारे दोघा आरोपींचा शोध घेतला. साहील वाघमारे आणि शाकिब शेख यांना १७ सप्टेंबरला अटक केली होती. त्यांच्याकडून दुचाकी आणि ३८ हजारांची रोकड जप्त केली. गुन्ह्यातील मुख्य आरोपी चेतन उर्फ चेत्या पसार झाला होता. तपास पथकाने १४ नोव्हेंबरला त्याला अटक केले. त्याच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र चोरीचा आणखी एक गुन्हा उघडकीस आणला आहे.

आरोपी चेतन हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याचेविरुध्द विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, एसीपी विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक अलका सरग, एपीआय कैलास डाबेराव, एपीआय गणेश रायकर, उपनिरीक्षक दिपाली पाटील, बाबा आहेर, किसन शिंगे, गणेश गायकवाड, निकाळजे, अतुल इंगळे, गजानन अवातिरक, प्रदिप खरात, प्रितम निकाळजे, शरद राऊत, रोहीत पाथरुट, मराठे यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×