Breking News
सुनावणी प्रक्रियेत दस्तऐवजीकरणाला प्राधान्य द्या : शीतल तेलीप्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख कार्याच्या आधारे जनतेचा विश्वास संपादन करा-राज्यपाल जिष्णु देव वर्माआदिवासी आश्रमशाळांमध्ये सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान राबविण्याचा निर्णयराज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना ‘संसदरत्न’ पुरस्कारगणेशमूर्ती कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या ३०० पर्यावरण मूर्तीमेट्रोची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; जिल्हा परिषद शाळांची प्रत्यक्ष पाहणी करा : डॉ. नीलम गोऱ्हेतब्बल १०० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे; सराईत चोर जेरबंदशेअरमध्ये गुंतवणूकीच्या नावाखालीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र बनावे – राज्यपाल जिष्णु देव वर्माटेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पिस्तूल बाळगणारा सराईत अटकेत

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेची कारवाई

marathinews24.com

पुणे – देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला गुन्हे शाखेने टिळक रस्ता परिसरात पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, तसेच तीन काडतुसे जप्त करण्यात आली. पूर्वेश उर्फ सार्थक दिनेश चव्हाण (वय २२, रा. हिराबाग, शुक्रवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

बाणेरमधील बड्या नेत्याच्या मुलाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा – सविस्तर बातमी

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेतील युनिट तीनचे पथक दांडेकर पूल परिसरात गस्त घालत होते. त्या वेळी चव्हाण याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असून, तो टिळक रस्ता परिसरात थांबल्याची माहिती पाेलीस कर्मचारी पंढरीनाथ शिंदे, तुषार किंद्रे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून चव्हाण याला पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन, तीन काडतुसे जप्त करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पंढरीनाथ शिंदे, मुकुंद तारु, अमोल काटकर, नितीन जगदाळे, मोहम्मद शेख यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×