Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

दुचाकींसह मोबाइल चोरणार्‍या सराईताला अटक; ६ मोबाइल जप्त

दुचाकींसह मोबाइल चोरणार्‍या सराईताला अटक; ६ मोबाइल जप्त

बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – मौजमजा करण्यासाठी दुचाकींसह मोबाइलची चोरी करणार्‍या सराईत आरोपीला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ३ दुचाकींसह सहा मोबाइल असा मिळून १ लाख ८० हजारांचा ऐवज जप्त केला आहे. बाळू प्रभाकर चव्हाण (वय ३८ रा. सदाशिव चाळ, जुन्नर एसटी स्टॅन्डसमोर, जि. पुणे ) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. वाहनचोरीच्या पार्श्वभूमीवर बिबवेवाडी पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. त्यावेळी पोलीस अंमलदार आशिष गायकवाड व विशाल जाधव यांना चोरीची दुचाकी विक्रीच्या तयारीत असलेल्या आरोपीची माहिती मिळाली.

हडपसर येथील स्पा सेंटरवर छापा; दोघांना बेड्या – सविस्तर बातमी 

पथकाने सापळा रचून बाळू चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून बिबवेवाडी हद्दीतून चोरलेली दुचाकी जप्त केली. चौकशीत त्याने जेजुरी ता. पुरंदर परिसरातून दोन दुचाकी आणि १० मोबाइल चोरीसह घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून तीन दुचाकी, ६ मोबाइल असा पावणेदोन लाखांचा ऐवज जप्त केला आहे. ही कामगिरी उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, एसीपी नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक सुरज बेंद्रे, पोलीस उपनिरीक्षक अमोल माने, संजय गायकवाड, विनोद जाधव, संजय आग्रे, आशिष गायकवाड, विशाल जाधव, सुमित ताकपिरे, ज्योतिष काळे, शिवाजी येवले, रक्षित काळे, संतोष बनसुडे, दत्ता शेंद्रे व राहूल खाडे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×