हडपसर येथील स्पा सेंटरवर छापा; दोघांना बेड्या

हडपसर येथील स्पा सेंटरवर छापा; दोघांना बेड्या

मॅनेजरसह दोघांना हडपसर पोलिसांनी ठोकल्‍या बेड्या

marathinews24.com

पुणे – स्पा सेंटरच्‍या नावाखाली वेश्या व्यावसाय करून घेणाऱ्या मॅनेजरसह दोघांना हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्‍या. यावेळी महिलेची सुटका करण्यात आली. सौरभ शामराव इंगळे (वय २८, रा. आचल पार्क, काळेपडह, हडपसर) राहुल संजीव देवनाथ ( वय २४ रा. आगरवाल बिल्‍डींग, युनिक स्पा मध्ये रविदर्शन, हडपसर मुळ रा. आसाम) अशी अटक करण्यात आलेल्‍या दोघांची नावे आहेत.

विश्रांतवाडीत पादचारी महिलेचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू – सविस्तर बातमी 

पुणे सोलापूर रोडवरील रविदर्शन चौकामध्ये असलेलया आगरवाल कॉर्नरच्‍या दुसऱ्या मजल्‍यावर युनिक स्पा सुरू होता. या ठिकाणी स्पा सेंटरच्‍या नावाखाली वेश्या व्यावसाय सुरू असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाल्‍यानंतर त्‍यांनी छापा टाकून कारवाई केली. यावेळी एका पिडीत महिलेकडून वेश्या व्यावसाय करून घेत असल्‍याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पिडीत महिलेची सुटका करून मॅनेजरसह दोघांना हडपसर पोलिसांनी अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये अटक केली. पुढील तपास हडपसर पोलिस करत आहेत.

मुंढव्यात हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटचा पर्दाफाश

मुंढव्यात बेकायदेशिररित्‍या सुरू असलेल्‍या हाय प्रोफाईल सेक्‍स रॅकेटचा पर्दाफाश मुंढवा पोलिसांनी करत तीन विदेशी महिलांची सुटका केली. यावेळी त्‍यांच्‍याकडून वेश्या व्यावसाय करून घेणाऱ्या युगांडा देशाच्‍या महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्‍या आहेत. सराह फिओना नागोबी (वय २७ मायुगे, युगांडा) असे अटक करण्यात आलेल्‍या महिलेचे नाव आहे.

मुंढव्यातील दळवी हाईट्स येथील चौथ्या मजल्‍यावर एका सदनिकेत ही कारवाई करण्यात आली. मुंढव्यात दळवी हाईट्समधील चौथ्या मजल्‍यावर हाय प्रोफाईल सेक्‍स रॅकेट सुरू असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्‍याच माहितीच्‍या आधारे पोलिसांनी छापा टाकला असताना युगांडा देशाच्‍या तीन महिलांकडून वेश्या व्यावसाय करून घेत असल्‍याचा प्रकार यावेळी उघडकीस आला. याप्रकरणी त्या तीन महिलांची सुटका करून एका महिलेला बेड्या ठोकण्यात आल्‍याची माहिती मुंढवा पोलिस ठाण्याच्‍या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्मिता वासनिक यांनी दिली. दरम्‍यान आरोपीचे व पिडीत महिलेचे पासपोर्ट पुढील तपासणीसाठी एफआरओ विभागाकडे पाठविण्यात आले आहे. या महिला टुरिस्‍ट विजावर भारतात आल्‍याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×