विश्रांतवाडीत पादचारी महिलेचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू

दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – विश्रांतवाडी परिसरात भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रेश्मा रामचंद्र भोसले (वय ६३, रा. हरेकृष्ण सोसायटी, विश्रांतवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार पवन आजिनाथ मांडगे (वय २५, रा. भारतमातानगर, आळंदी रस्ता, दिघी ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सूरज रामचंद्र भोसले (वय २९) याने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वडकी परिसरात घरफोडी, २ लाखांचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्मा भोसले विश्रांतवाडी भागात राहायला आहेत. १ डिसेंबर रोजी त्या सायंकाळी आळंदी येथे दर्शनासाठी निघाल्या होत्या. सायंकाळी सातच्या सुमारास विश्रांतवाडीतील म्हस्के वस्तीजवळ असलेल्या पीएमपी थांब्यासमोर भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली. अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत.

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (२ डिसेंबर) घडली. याप्रकरणी डंपरचालक उत्तम तुकाराम जावीर (वय ५३, सध्या रा. आकांक्षा सोसायटी, येवलेवाडी, कोंढवा, मूळ रा. खडी, परभणी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय मुरलीधर भापकर (वय ५५, रा. स्वयंभू निवास, शिक्षक काॅलनी, भेकराईनगर, फुरसुंगी, हडपसर ) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत विशाल दत्तात्रय भापकर (वय २९) याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार दत्तात्रय भापकर हे कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावरुन मंगळवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास निघाले होते. त्यावेळी ओंकार प्राईड लाॅजसमोर भरधाव डंपरने दुचााकीस्वार भापकर यांना धडक दिली. अपघातात त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक खोपडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×