Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

जनरल निरीक्षक विद्यानंद सिंग आणि पोलीस निरीक्षक एन. कोलनची यांची मतदान केंद्रांना भेटी

जनरल निरीक्षक विद्यानंद सिंग आणि पोलीस निरीक्षक एन. कोलनची यांची मतदान केंद्रांना भेटी

निवडविषयक कामकाज आणि तयारीचा घेतला आढावा

marathinews24.com

बारामती – बारामती पोटनिवडणूकीच्या अनुषंगाने मतदारसंघाचे जनरल निरीक्षक विद्यानंद सिंग आणि पोलीस निरीक्षक एन. कोलनची यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील नामनिर्देशन कक्षाला भेट देवून उपलब्ध सर्व सुविधांची पाहणी केली तसेच निवडणुकीच्या सर्व तयारीचा आणि कामकाजाचा आढावा घेतला.

कामात हलगर्जीपणा करणाऱ्या दोन मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल – सविस्तर बातमी 

उमेदवारांना देण्यात येणारे नामनिर्देशन पत्र आणि त्या अनुषंगिक कागदपत्रांची पडताळणी केली. उमेदवारांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे तसेच सह. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी करण्यात येणाऱ्या कामकाजाबाबत संपूर्ण माहिती दिली. यानंतर मळद, गुणवडी, डोर्लेवाडी, मेखळी, जळगाव, कऱ्हावाघज, मोरगाव, तरडोली आदी मतदान केंद्राला भेट देवून पाहणी केली.

यावेळी दोन्ही निरीक्षकांनी मतदान केंद्रावरील वीज, पाणी, शौचालय, रॅम्प, संरक्षक भिंती इत्यादीची पाहणी केली. आणि नादुरुस्त असल्यास दुरुस्ती करून घेण्याच्या सूचना दिल्या. मेखळी येथील एसएसटी पथकास भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.

यावेळी बारामती शहरचे पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवळशेट्टी, बारामती ग्रामीणचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षकाचे संपर्क अधिकारी आबा गाढवे जनरल निरीक्षकाचे संपर्क अधिकारी सुभाष पाटील सर्व मतदान केंद्र गावातील तलाठी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×