व्यावसायिकाची ४३ लाखांची फसवणूक
marathinews24.com
पुणे – शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्यांनी व्यावसायिकाला तब्बल ४३ लाखांचा आर्थिंक गंडा घातला आहे. ही घटना नोव्हेंबर २०२५ ते २७ जानेवारील २०२६ कालावधीत बिबवेवाडीत घडली आहे. याप्रकरणी ४७ वर्षीय व्यक्तीने मार्वेâटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाईल धारक व लिंक धारक यांच्यावर आयटी अॅक्टसह फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यात वेश्या व्यवसायाचा पर्दापाश; दोघींची सुटका – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे व्यावसायिक असून, बिबवेवाडीत राहायला आहेत. १६ नोव्हेंबरला सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर लिंक पाठवली. शेअर मार्वेâटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याची बतावणी केली. त्यांचा विश्वास संपादन करून गुंतवणूकीला भाग पाडले. त्यांच्याकडून तब्बल ४२ लाख ६६ हजार रुपये ऑनलाईनरित्या वर्ग करून घेतले. गुंतवणूक केल्यानंतर त्यावर परतावा न देता फसवणूक केली आहे. पोलिस निरीक्षक सुनिता नवले तपास करीत आहेत.
























