Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक पडली ३५ लाखांना

सायबर चोरट्यांकडून तरूणाला गंडा

marathinews24.com

पुणे – शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी तरूणाला तब्बल ३५ लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना ८ ते ३१ जुलैला सिंहगड रस्ता परिसरात घडली असून, परशुराम प्रभुणे (वय ४७ रा. सिंहगड रस्ता) यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइल धारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेचे आत्महत्या –  सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रभुणे हे सिंहगड रस्ता परिसरात राहायला असून, ८ जुलैला सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. काही दिवसांनी सायबर चोरट्यांनी त्यांचा विश्वास संपादित करून रक्कम वर्ग करण्यास भाग पाडलेह. अवघ्या तीन आठवड्यात प्रभुणे यांनी तब्बल ३५ लाख रूपये ऑनलाईनरित्या संबंधिताच्या बँकखात्यात वर्ग केली. मात्र, त्यांना बोलीप्रमाणे चांगला परतावा मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी विचारणा केली असता, आरोपींनी संपर्क बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रभुणे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस तपास करीत आहेत.

तरूणालाही १५ लाखांना ऑनलाईन गंडा

शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी तरूणाला १५ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना २५ मार्च ते १४ मे कालावधीत हडपसरमध्ये घडली आहे. याप्रकरणी अमोल मदने वय ३६, रा. हडपसर यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष सायबर चोरट्यांनी अमोलला दाखवले. त्यानुसार त्यांनी १५ लाखांची गुंतवणूक केली होती. मात्र, त्यानंतर सायबर चोरट्यांनी संपर्क बंद करीत फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×