Breking News
‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन

खतांची विक्री ई-पॉस प्रणालीद्वारे करणे बंधनकारक

खतांची विक्री ई-पॉस प्रणालीद्वारे करणे बंधनकारक

विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केले जाहीर 

marathinews24.com

पुणे – सर्व किरकोळ रासायनिक खत विक्रेत्यांनी अनुदानित रासायनिक खतांची विक्री ही ई-पॉस (e-PoS) प्रणालीच्या माध्यमातून करणे बंधनकारक आहे. तसेच खत विक्रीच्या नोंदी या तात्काळ आणि अचूक पद्धतीने प्रणालीमध्ये समाविष्ट होणे आवश्यक असल्याचे विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

निविष्ठा विक्रीसाठी इतर निविष्ठांची सक्ती न करणेबाबत सूचना – सविस्तर बातमी 

विक्रेत्यांच्या ई-पॉस प्रणालीवरील खत साठा व प्रत्यक्ष गोडाऊनमधील साठा यामध्ये कोणतीही तफावत राहू नये. यासाठी रासायनिक खतांच्या विक्रीची नोंद ही आयएफएमएस (IFMS) प्रणालीमध्ये त्याच क्षणी (Real Time) घेणे बंधनकारक आहे.

ज्या विक्रेत्यांनी अद्याप नवीन L1 सिक्युरिटी ई-पॉस मशीन प्राप्त केलेले नाहीत त्यांनी संबंधित जिल्ह्यातील कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधून मशीन प्राप्त करून ती कार्यान्वित करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत नियमित तपासणी करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील खत निरीक्षकांना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ई-पॉस प्रणालीवरील साठा व प्रत्यक्ष साठा यात फरक आढळून आल्यास संबंधित विक्रेत्यांच्या परवान्यावर नियमित कारवाई करण्याच्या सूचना परवाना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे गावसाने यांनी स्पष्ट केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×