Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

इतिहास, संस्कृती जतन करणे आपले कर्तव्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इतिहास, संस्कृती जतन करणे आपले कर्तव्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संस्कृती हीच आपली शक्ती असून, त्यावरच परकीय शत्रूंनी आक्रमक केले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

marathinews24.com

पुणे – हिंदुस्थानचा इतिहास आणि संस्कृती प्राचीन काळापासून जगविख्यात असून, त्याचे जतन करणे आपले कर्तव्य आहे. ज्ञान आणि संस्कृती हीच आपली शक्ती असून, त्यावरच परकीय शत्रूंनी आक्रमक केले होते. मात्र, तरीही पूर्वीपासून चालत आलेली संस्कृती आजही कायम असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन – सविस्तर बातमी 

लेखक प्रशांत पोळ लिखित खजिन्याची शोधयात्रा या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले. यावेळी मुर्ती शास्राचे अभ्यासक डॉ. गो. व. देगलूरकर, मंत्री चंद्रकांत पाटील, मध्य प्रदेशातील मंत्री राकेश सिंह, राजेश पांडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्या देशात प्रामुख्याने सनातन संस्कृती अखंडपणे चालत आलेली आहे. आपल्या संस्कृतीचे स्वरूप ६ हजार वर्षांपूर्वीचे असून, आता उत्खननात सरस्वतीची संस्कृती असल्याचे दिसून येत आहे. सरस्वती नदीचे जे अवशेष दिसतात, त्याचा उल्लेख वेदशास्त्रमध्ये आहे. आपली संस्कृत १० हजार वर्षांपूर्वीची भाषा विकसित होती. जगात व्यापारात पहिल्या शतकात आपली अधोगती झाली. त्यावेळी आपल्याला भौतिक आणि सांस्कृतिक दृष्टीने लुटले गेले होते. मात्र, त्यांनतरही आपल्या देशाने प्रगती साधली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वैदिक ग्रंथ नव्याने लिहण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, जपानमध्ये २ हजार गणपती मंदिर होते. आता अजूनही २०० पेक्षा अधिक मंदिरे आहेत. तिथे दोन हजार वर्षांपूर्वी पासून संस्कृतीमध्ये आरती सुरू आहे. तसेच आयुर्वेद ग्रंथात अनेक उपचार पद्धती असून, त्या पुस्तकातुन आम्हाला प्रेरणा मिळते. लेखक प्रशांत पोळ यांनी शोधयात्रा अशीच सुरू ठेवावी, असे त्यांनी सांगितले.

डॉ. गो. व. देगलूरकर म्हणाले, हिंदुस्थानाची संस्कृती सनातन असून, नेहमी ती बदलत जाणारी आहेत. आपल्या देशाने फक्त वेद उपनिषदे नाही सांगितले. तर अनेक वैज्ञानिक दृष्टिकोनही जगाला दाखवून दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले. लेखक प्रशांत पोळ म्हणाले, पुस्तकासाठी अनेकांनी मला मदत केली आहे. त्यामुळे पुस्तक पूर्ण झाले आहे. हिंदी आणि गुजराती भाषेत लवकरच पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन विनया देसाई, दीपा भंडारी यांनी केले. तर रवींद्र घाटपांडे यांनी आभार मानले.

तपासात कोणीही दबाव आणू नये, तसे निर्णय घेतले-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पिंपरी चिंचवड पोलिसांनी आरोपी निलेश चव्हाण याला पकडले आहे. तसेच हगवणे बंधूनी पत्ता बदलून शस्त्र परवाना मिळवला बाबतीत तत्कालीन अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर आरोप झाले आहेत. अशी तक्रार आली असून, ते पाहण्यासाठी आम्ही सांगितले आहे. तसेच वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाच्या तपासात कोणीही दबाव आणू नये, कोणी गडबड करू नये, यादृष्टीने आम्ही निर्णय घेतले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×