Breking News
पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात राहुल गांधीच्या “छात्रों की गुंज” कार्यक्रमासाठी अटी घालून परवानगीव्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खूनकोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळापुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतलेसुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहनपिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेतवयस्कर  शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधासहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

डेक्कनमध्ये मोटारीतून दागिने चोरीला

हडपसरमधील सराफी पेढीवर भरदिवसा दरोडा

डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मोटार चालकाचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी १ लाख १५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना डेक्कन जिमखाना भागात घडली. महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सिंहगड रस्ता परिसरात सराइताचा खून – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मूळच्या शिरुर तालुक्यातील केंदूर गावच्या रहिवासी आहेत. त्या कुटुंबीयांसोबत डेक्कन जिमखाना परिसरातील एका हाॅटेलमध्ये आल्या होत्या. मोटार त्यांनी हाॅटेलच्या परिसरात लावली होती. त्यावेळी मोटार चालकाचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी मोटारीत ठेवलेले एक लाख १५ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली. सहायक फौजदार डेंगळे तपास करत आहेत.

पीेएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविले

पीएमपी प्रवासी महिलेच्या गळ्यातील ६० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याची घटना कात्रज भागात घडली.
याबाबत एका महिलेने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला धनकवडी भागात राहायला आहेत. १६ ऑक्टोबर रोजी त्या कात्रज बस स्थानक ते धनकवडी दरम्यान पीएमपी बसमधून प्रवास करत होत्या. बसमध्ये गर्दी होती. प्रवासात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले. मंगळसूत्र चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस कर्मचारी जमदाडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×