Breking News
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची घेतली सदिच्छा भेटराज्याच्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याला मोठा निधीभांडगावच्या भक्तामर कलश तीर्थावर भव्य पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवअजितदादांचा घातपातच, व्हीएसआरला व्हीआयपी ट्रीटमेंट- आमदार रोहित पवारपुण्यात बालेवाडीतील बारमध्ये तरुण-तरुणीचा गोंधळमहाबोधी महाविहार मुक्तीसाठी १० मार्चला पुण्यात राष्ट्रव्यापी धरणे आंदोलनअनैतिक संबंधाला विरोध केल्याने मनोरूग्ण महिलेचा खूनवाहनाच्या धडकेत तरूण ठार, खराडीतील घटनातरुणाला शेअरमधील गुंतवणूक पडली १४ लाखांनाविश्रांतवाडीत दुकानातील रोकड चोरीला

कात्रजमध्ये फ्लॅटमधून ४ लाखांचे दागिने चोरी

कात्रजमध्ये फ्लॅटमधून ४ लाखांचे दागिने चोरी

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – फ्लॅटमधून ४ लाख २१ हजार रुपयांचे दागिने चोरीला गेल्याची घटना भारती विद्यापीठ भागात घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात थेट सोसायटीतच थाटले हुक्का पार्लर – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ५३ वर्षीय महिला कात्रजमधील लेकटाऊन सोसायटीत राहायला आहेत. ३ फेब्रुवारी रोजी त्यांच्या नातवाचा वाढदिवस होता. त्यांनी शयनगृहातील कपाटातील दागिने काढून वाढदिवसाच्या कार्यक्रमात परिधान केले होते. त्यानंतर फिर्यादी महिलेच्या ओळखीतील एकाचा विवाह समारंभ होता. महिलेने कप्यात दागिने न ठेवता कपाटात ठेवले होते. कपाटात त्यांनी कप्याची चावी ठेवली होती. विवाह समारंभानिमित्त दागिने परिधान करण्यासाठी त्यांनी कपाट उघडले. तेव्हा कपाटात ठेवलेले चार लाख २१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला. महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.

महिलेच्या घरातून दागिने चोरणारा चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस हवालदार पिसाळ तपास करत आहेत. शहरात सदनिकेचे कुलूप तोडून दागिने चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. सोमवार पेठ, मार्केट यार्ड भागात सदनिकेचे कुलूप तोडून ३० लाख रुपयांचे दागिने लांबविल्याची घटना नुकतीच घडली होती. भरदिवसा सोसायटीतील बंद सदनिकांचे कुलूप तोडून ऐवज चोरुन नेण्याच्या घटना वाढल्या आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×