Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

पुण्यातील तुळशीबागेत महिलेच्या पिशवीतून ६ लाखांचे दागिने चोरीला

तुळशीबागेत महिलेचे दीड लाखांचे दागिने चोरी

चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून ६ लाख २७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिबवेवाडी, कोंढव्यात घरफोडी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३९ वर्षीय महिला वाघोली भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. १९ एप्रिल रोजी सायंकाळी त्या तुळशीबागेत नातेवाईकांसोबत खरेदीसाठी आल्या होत्या. अक्षय्य तृतीया असल्याने त्यांनी सराफी पेढीतून दागिने खरेदी केले होते. दागिने एका छोट्या खोक्यात ठेवण्यात आले होते. हे खोके त्यांनी पिशवीत (पर्स) ठेवले होते. अक्षय तृतीया असल्याने तुळशीबागेत खरेदीसाठी गर्दी होती. तुळशीबागेतील बँक ऑफ महाराष्ट्राच्या गल्लीत चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतून दागिने ठेवलेले खोके चोरून नेले. महिला घरी पोहोचल्यानंतर पिशवीतून दागिने ठेवलेले खोके चोरून नेल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी ६ लाख २७ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. महिलेने नुकतीच पोलिसांकडे फिर्याद दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर तपास करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून तुळशीबागेत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यापार्श्वभूमीवर तुळशीबागेत पोलिसांनी गस्त वाढवावी. महिलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तुळशीबाग व्यापाारी असोसिएशनचे पदाधिकारी, तसेच छोटे व्यावसायिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच केली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×