Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

बिबवेवाडी, कोंढव्यात घरफोडी

लक्ष्मी रस्त्यावर महिलेच्या पिशवीतून दागिने चोरीला

पावणेतीन लाखांचा ऐवज चोरी

marathinews24.com

पुणे – शहरातील बिबवेवाडी, कोंढवा परिसरात चोरट्यांनी दोन सदनिकांचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने, रोकड, मोबाइल संच असा मुद्देमाल लांबविल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बिबवेवाडीतील रम्यनगनगरी हाऊसिंग सोसायटीत सदनिकेतून चोरट्यांनी मोबाइल आणि मनगटी घड्याळ असा ९१ हजार मुद्देमाल लांबविल्याची घटना सोमवारी (२७ एप्रिल) घडली. याबाबत एकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे पोलिसांच्या तत्परतेमुळे ज्येष्ठाचा आत्महत्येचा प्रयत्न असफल – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणाने सोमवारी सकाळी सदनिकेला बाहेरुन कडली लावली. कामानिमित्त सोसायटीच्या आवारात तक्रारदार गेला. चोरट्याने संधी साधली. सदनिकेची कडी उघडून चोरटा घरात शिरला. चोरट्याने मोबाइल संच, महागडे घड्याळ असा मुद्देमाल लांबविला. पाेलीस हवालदार जाधव तपास करत आहेत.

कोंढवा परिसरातील शिवनेरीनगरमध्ये सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील रोकड आणि सोन्याचे बिस्कीट असा एक लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत एकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे शिवनेरीनगरमधील महम्मद सैफ टाॅवर या सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी बंद सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातून ऐवज लांबविल्याची घटना २५ एप्रिल रोजी उघडकीस आली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×