पुणे पोलिसांच्या तत्परतेमुळे ज्येष्ठाचा आत्महत्येचा प्रयत्न असफल

पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

marathinews24.com

पुणे – शहरातील चंदननगर भागातील एका सोसायटीत असलेल्या सदनिकेत ज्येष्ठ नागरिकाने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. पोलिसांना याबाबतची माहिती ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाने दिल्यानंतर त्वरीत घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाला आत्महत्येपासून परावृत्त केले.

तू माझी नाही झालीस, तर कुणाची होऊ देणार नाही – सविस्तर बातमी

चंदननगर भागात एका सोसायटीत ज्येष्ठ नागरिक राहायला आहेत. सोमवारी सायंकाली सातच्या सुमारास महात्मा फुले पोलीस चौकीतील पोलीस कर्मचारी तलवारे, सतीश कतारी हे गस्त घालत होते. त्या वेळी पोलीस नियंत्रण कक्षाशी ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाने संपर्क साधला. वडील आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात आहेत, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस कर्मचारी तलवारे, कतारी यांनी संबंधित सोसायटीत धाव घेतली. पोलिसांनी सदनिका शोधून काढली. तेव्हा सदनिकेचा दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर तलवारे आणि कतारी यांनी क्षणाचा विलंब न लावता त्वरीत एका वेल्डींग कारागिराशी संपर्क साधला. वेल्डींग कारागिराने आतून बंद असलेला दरवाजा उघडला. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी ज्येष्ठ नागरिक गळफास घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे पाहिले.

‘पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाला धीर देऊन खाली उतरविले. त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घाव घेऊन ज्येष्ठ नागरिकाला आत्महत्येपासून परावृत्त केले. पोलीस कर्मचारी तलवारे आणि कतारे यांनी केलेल्या कामगिरीची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. पोलीस ठाण्यात दोघांचा सत्कार करण्यात आला’, अशी माहिती चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश बडाख यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×