Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

काळू धरणाचा संघर्ष पेटण्याची शक्यता

काळू धरणाचा संघर्ष पेटण्याची शक्यता

शेतकरी नेते राजू शेट्टी यांची आंदोलनाची हाक

marathinews24.com

ठाणे – जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यासह मुंबई, ठाणे, कल्याण ,डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर सारख्या वाढत्या शहरांना पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने एमएमआरडीए यांच्या माध्यमातून प्रस्तावित असलेल्या काळू धरणाचा संघर्ष सद्या पेटण्याची चित्र दिसून येत आहेत. शनिवारी (दि.२३) काळू नदी धरणग्रस्त सामाजिक संस्था, काळू परिसर यांच्या तळेगांव येथील कार्यालयाला शेतकरी नेते तथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी भेट दिली. प्रस्तावित काळू व शाई धरण बाधित क्षेत्रातील शेतकरी प्रतिनिधींशी संवाद साधून आंदोलनाची दिशा तसेच धरणसंबंधी प्रशासकीय पातळीवर सुरू असलेल्या हालचाली आणि त्यामुळे निर्माण झालेले शेतकरी प्रश्न याविषयी चर्चा केली.

वाघ-मानव संघर्ष रोखण्यासाठी नागरिकांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून द्या- शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी 

सरकारच्या अन्यायकारक धोरणाविरोधात सर्वच काळू व शाई धरण परिसरातील नागरिकांनी एकत्र येत रस्त्यावर उतरण्याची तयारी करण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे . तसेच आगामी काळात प्रत्येकवेळी धरणग्रस्तांच्या पाठीशी उभे राहून, संघर्षात साथ देण्याचे आश्वासन राजू शेट्टी यांनी दिल्याचे संस्थेचे अध्यक्ष संभाजी फनाडे यांनी सांगितले आहे. यावेळी राजू शेट्टी यांनी धरण क्षेत्रातील जनसामान्यांच्या भावना उपस्थित शेतकरी प्रतिनिधी यांच्याकडून जाणून घेतल्या. पुढील पंधरवड्यात श्रमिक मुक्ती संघटना आणि काळू व शाई धरणाच्या कृती समिती यांनी संयुक्तरित्या निश्चित केलेल्या दिवशी उपविभागीय अधिकारी कल्याण तथा भूसंपादन अधिकारी काळू प्रकल्प यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून जाब विचारणार असल्याचां प्रशासनाला इशारा दिला.

याप्रसंगी काळू संघर्ष समितीचे पोपटराव देशमुख, हरिभाऊ राऊत , गणेश फनाडे, ठाणे जिल्हा देशमुख मराठा समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष विलासकाका देशमुख, शाई संघर्ष समितीचे उमेश वारघडे, हिरामण भोईर, ज्येष्ठ शेतकरी शिवाजी अण्णा देशमुख, शशी देशमुख, सुभाष चौधरी, चंद्रकांतदादा देशमुख, रघु तात्या देशमुख, अरुण चौधरी, रंगनाथ देशमुख, विश्वनाथ देशमुख, रामभाऊ देशमुख, आदिवासी प्रतिनिधी रमेश खाकर, भाऊ पारधी, पांडू खडके, माहिती अधिकार संघाचे जिल्हाप्रमुख संतोष राऊत, मुरबाड तालुका कुणबी समाजोन्नती मंडळाचे सरचिटणीस संभाजी गोडांबे, उपसरपंच भावेश पठारे, युवा शेतकरी तानाजी देशमुख, तुषार देशमुख, बाळा आगिवले यांच्यासह काळू नदी धरणग्रस्त सामाजिक संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×