Breking News
जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने माहितीचा संग्रह निर्मितीसाठी स्व-गणना महत्वपूर्ण-अपर जिल्हाधिकारी सतीश राऊतमहापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभबारामती पोटनिवडणूक मतमोजणी ४ मे रोजी; प्रशासनाची जय्यत तयारीमुंबई-पुणे प्रवासातील वाहतूक कोंडी फुटली; ‘मिसिंग लिंक’ म्हणजे आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कारहुतात्मा स्मारकाला उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिवादनमिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रमबाह्यवळण मार्गावर कंटेनरवर मोटार आदळून एकाचा मृत्यूखराडीत दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूसिंहगड किल्ल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्याप्रेमप्रकरणातून तरुणीचा ब्लेडने गळा चिरला

कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे भक्ती व समाजसेवेचा संगम

कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे भक्ती व समाजसेवेचा संगम

 २१८ जणांनी  रक्तदान करीत सेवा परंपरा कायम

marathinews24.com

पुणे – पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडळ आयोजित वार्षिक रक्तदान शिबिर यावर्षी मोठ्या उत्साहात पार पडले. प्रमुख पाहुणे श्री रमेश भागवत (विश्वस्त, श्री देवदेवेश्वर संस्थान, पुणे) यांच्या उपस्थितीत उत्सव मंडपात आयोजित या उपक्रमात तब्बल २१८ गणेशभक्तांनी रक्तदान करून गणेश भक्तीला समाजसेवेची जोड दिली.

अवयवदानाविषयी जनजागृती होणे आवश्यक- डॉ. अविनाश भोंडवे – सविस्तर बातमी  

रमणबाग युवा मंच (ढोल पथक), रुद्र गर्जना ढोल पथक, संघर्ष ढोल पथक, परशुराम ढोल पथक, अभेद्य ढोल पथक या सर्व पथकांच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करून गणेशसेवेचा अर्थ अधिक व्यापक केला. तसेच श्री कसबा गणपती मंडळाचे कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचा सक्रिय सहभाग लक्षणीय ठरला. या उपक्रमाचा पाया २००९ मध्ये स्वाईन फ्लूच्या कठीण काळात घातला गेला. त्या वेळी रक्तदानासाठी पुढे येण्यास लोक टाळत होते, मात्र मंडळाने भीतीला न जुमानता हा उपक्रम सुरू केला.

दरवर्षी शिबिरात सहभागी होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असून, ही सेवा परंपरा आज गणेशोत्सवातील एक महत्त्वाचा घटक ठरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जनकल्याण रक्तपेढीच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवला जात आहे. या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. मंडळाच्या वतीने सर्व रक्तदाते, सहकारी संस्थां, ढोल पथक कार्यकर्ते आणि समाजहितासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×