Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

कथक नृत्यांगना श्रद्धा मुखडे हिला युवा पुरस्कार

देशपातळीवर घेण्यात आलेल्या स्पर्धेत बहुमान

marathinews24.com

पुणे – दिल्लीतील पंडित बिरजू महाराजजी कलाश्रमतर्फे देशपातळीवर घेण्यात आलेल्या नृत्य स्पर्धेत नृत्यगुरू शभा भाटे यांची शिष्या आणि पुण्यातील युवा कथक नृत्यांगना श्रद्धा मुखडे हिला पहिल्या नृत्यगुरू पंडित बिरजू महाराज युवा पुरस्काराने गौरविण्यात आले.लखनऊ घराण्याचे प्रसिद्ध कथक नर्तक, पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांनी कलाश्रम ही संस्था स्थापन केली. पंडित बिरजू महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती चिरंतन रहाव्यात यासाठी संस्थेतर्फे पंडित बिरजू महाराज कलाश्रमतर्फे साधना महोत्सवात १८ ते २५ वयोगटातील कथक नृत्य कलाकारांसाठी देश पातळीवर कथक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

चेहऱ्यावरील हास्य ही देवाची सर्वांत मोठी कलाकृती -ब्रम्हर्षी गुरुदेव – सविस्तर बातमी

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संस्थेतर्फे अर्ज मागविण्यात आले होते. देशाच्या विविध भागातून या स्पर्धेत सहभागी झालेल्या कलाकारांमधून २० कलाकारांची अंतिम फेरीसाठी निवड झाली. अंतिम फेरी दिल्ली येथील त्रिवेणी कलासंगम ऑडिटोरिअम येथे घेण्यात आली. महाराष्ट्रातील केवळ तीन स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले होते. नृत्यगुरू शभा भाटे यांच्याकडे गेल्या १० वर्षांपासून श्रद्धा मुखडे नृत्याचे प्रशिक्षण घेत असून त्यांच्या समवेत विविध नृत्य महोत्सवांमध्ये सहभागी होत आहे. कथक गुरू मंजुश्री चॅटर्जी आणि कथक गुरू डॉ. पद्मश्री शोभना नारायण यांच्या हस्ते श्रद्धा मुखडे हिला पंडित बिरजू महाराज युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गुरू मंजुश्री चॅटर्जी, गुरू गीतांजली लाल, संगीता सिन्हा, कल्पना वर्मा, अनिता कुलकर्णी यांनी स्पर्धेचे परिक्षण केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×