Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Katraj Traffic Diversion Pune : मेट्रोच्या कामानिमित्त कात्रज चौकात जड वाहनांना बंदी

Katraj Traffic Diversion Pune

वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – Katraj Traffic Diversion Pune : शहरातील स्वारगेट ते कात्रज दरम्यान भूमिगत मेट्रोचे काम सुरू आहे. कात्रज चौकातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक शाखेने अवजड वाहनांच्या वाहतुकीत बदल करण्याचे आदेश दिले आहेत. कात्रज चौकातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. जड आणि अवजड वाहनांनी (डंपर, सिमेंट मिक्सर, ट्रेलर, कंटेनर) कात्रज चौकातून न जाता पर्यायी मार्गांचा वापर करावा’, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

आमदार सुनील शेळकेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली; आरटीआय कार्यकत्याचा आरोप – सविस्तर बातमी 

पुणे-सातारा महामार्गावर कात्रज जुन्या बोगद्यामार्गे येणाऱ्या वाहनांना शिंदेवाडीपासून प्रवेश बंद करण्यात येणार आहे. सातारा रस्त्यावरुन नवीन बोगदामार्गे कात्रजकडे येणाऱ्या वाहनांना नवले पूल येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावरील वारजे भागातून कात्रजकडे येणाऱ्या वाहनांना नवले पूल येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. Katraj Traffic Diversion Pune सोलापूरकडून हडपसर, मंतरवाडी, कात्रज-कोंढवा रस्त्याने कात्रजकडे येणाया जड वाहनांना मंतरवाडी चौकाच्या पुढे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. बोपदेव घाटमार्गे कात्रज-कोंढवा रस्त्याने कात्रजकडे येणाऱ्या जड वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. मार्केट यार्ड, गंगाधाम, बिबवेवाडीमार्गे कात्रजकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. स्वारगेटकडून कात्रज चौकात जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

अवजड, जड वाहनांनी नवले पूल, नवीन कात्रज बोगदा, खेड शिवापूर, सासवड, गराडे, चिंबळी, सासवड, मंतरवाडी, वडकी या मार्गाचा वापर करावा. नवले पूल, नवीन कात्रज बोगदा, खेड शिवापूर, गराडे, भिवरी, बोपदेव घाट, येवलेवाडी, पिसोळी, मंतरवाडी या मार्गाचा वापर करावा. मुंबईकडून वारजेमार्गे कात्रजकडे येणाऱ्या वाहनांना नवले पूल येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. साताऱ्याहून स्वारगेटकडे येणाऱ्या एसटी बस, प्रवासी वाहनांनी नवले पूल परिसरातून उजवीकडे वळावे. कात्रज मार्गे स्वारगेटकडे जावे.

कात्रज परिसरातील रहिवाशांसाठी पर्यायी मार्ग

कात्रजकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी कात्रज चौकातून न जाता. अन्य पर्यायी मार्गांचा वापर करावा. वंडरसिटी सोसायटी ते कात्रज बायपास चौकात दुतर्फा वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. कात्रज बायपास चौक ते मोरे बाग दुतर्फा वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. कात्रज बायपास चौक ते राजस सोसायटी, बायपास चौक ते कात्रज जुना बोगद्यापर्यंत वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×