बुटात चावी ठेवणे अंगलट, दोन लाखांची घरफोडी

बुटात चावी ठेवणे अंगलट, दोन लाखांची घरफोडी

नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – नागरिकांनो सावधान, तुम्ही बाहेरगावी जाताना शुज रॅकमधील बुटामध्ये चावी लपवत असाल तर खबरदारी घेणे गरजेचे आहे. अन्यथा चोरट्यांकडून सहजरित्या तुमच्या घरात प्रवेश करून ऐवजांची चोरी केली जाउ शकते. अशाच एक प्रकार धायरीतील रायकर मळ्यात घडला आहे. चोरट्यांनी शुज रॅकमधील चावी शोधून घरफोडी करीत दोन लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खून करण्यासाठी कोयते बाळगले, चौघे अल्पवयीन ताब्यात – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे धायरीतील रायकरमळ्यात राहायला आहेत. १६ मार्चला सकाळी दहाच्या सुमारास ते फ्लॅट बंद करून बाहेर गेले होते. त्यावेळी त्यांनी फ्लॅटच्या कुलूपाची चावी शुज रॅकमध्ये लपवून ठेवली होती. दरम्यान, दुपारच्या सुमारास चोरट्यांनी श्री हाईट्स सोसायटीत प्रवेश केला. तक्रारदारासह त्यांच्या शेजारी राहणार्‍याच्या घरात शिरून १ लाख ९१ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राहूल यादव तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×