Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Kir​​an Jadhav ACB Case : उत्पन्नापेक्षा गोळा केली ४ कोटी ३७ लाख अधिकची मालमत्ता

Kir​​an Jadhav ACB Case

तत्कालीन कृषी उपसंचालकासह पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – Kir​​an Jadhav ACB Case : राज्य सेवेत वरिष्ठ पदावर कार्यरत असलेल्या उपसंचालकाने उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती गोळा केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांनी उत्पन्नापेक्षा ४ कोटी ३७ लाख ७४ हजार ९३० रुपयांची (१२८टक्के) इतकी अपसंपदा भ्रष्ट मार्गाने धारण केल्याचे निष्पन्न झाले. तत्कालीन कृषी उपसंचालक आणि दक्षता पथक व तत्कालीन तंत्र अधिकारी खते संचालक किरण जाधव यांच्यासह पत्नीवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डधारक ३० स्केटर्सचा अचिव्हर्स स्पीड स्केटिंग क्लबतर्फे सत्कार – सविस्तर बातमी 

किरण श्यामराव जाधव आणि संगीता किरण जाधव (दोघे रा. कुंदन पार्क, शिवाजीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. किरण जाधव सध्या सोलापूर येथील आत्मा येथे उपसंचालक, प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी एप्रिल २०२५ मध्ये कृषी विभागातील परवान्यांच्या संदर्भात आणि आर्थिक गैरव्यवहाराचे त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकांनी २ डिसेंबर २०२५ रोजी किरण जाधव यांची उघड चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार एसीबीने त्यांची चौकशी सुरू केली होती. ३१ वर्षातील उत्पन्नाची तपासणी केली.

उघड चौकशीमध्ये ४ जून १९९४ ते २ डिसेंबर २०२५ या परीक्षण कालावधीचे उत्पन्नाची तपासणा केली. (Kir​​an Jadhav ACB Case) त्यामध्ये त्यांनी वैध उत्पन्नापेक्षा ४ कोटी ३७ लाख ७४ हजार ९३० रुपयांची (१२८टक्के) इतकी अपसंपदा भ्रष्ट मार्गाने धारण केल्याचे निष्पन्न झाले. ही अपसंपदा भ्रष्ट मार्गाने धारण करण्यासाठी त्यांना पत्नी संगीताची अपप्रेरणा मिळाली. याप्रकरणी दोघांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबत अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×