Breking News
वैमनस्यातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वारपर्वती परिसरात तरुणाला चाकूच्या धाकाने लुटलेगॅस देयकाच्या नावाखाली महिलेची अडीच लाखांची फसवणूकजागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात साडेतीन हजाराहून अधिक सायकलप्रेमींचा उत्स्फूर्त सहभागपुण्यात रेव्ह पार्टीवर गुन्‍हे शाखेचा छापा – आयोजकांसह 78 जणांवर गुन्‍हा दाखल‘पेन्शन कार्ड’च्या बतावणीने ज्येष्ठाची १६ लाखांची फसवणूकउत्पादन, वितरण अन् बाजारपेठेची साखळी निर्माण करून महिला बचत गटांनी आर्थिक क्रांती करावी; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहनमाजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या कुटुंबीयांचे डॉ. नीलम गोऱ्हेंकडून सांत्वनभारतीय संस्कृती केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही प्रभावी – डॉ. गो. बं.  देगलूरकरपुणे ग्रँड टूर सायकल शर्यतीला जगातील चौथी ग्रँड टूर बनविण्यासाठी यूसीआय करणार सहकार्य

कोथरुडने कलाक्षेत्राला अनेक दिग्गज मान्यवर दिले – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

कोथरुडने कलाक्षेत्राला अनेक दिग्गज मान्यवर दिले - केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

समाजाची गरज ओळखून उपक्रम आखणं ही मोदीजींची शिकवण – मंत्री चंद्रकांत पाटील

marathinews24.com

पुणे – कोथरुडने कलाक्षेत्राला अनेक दिग्गज कलावंत दिले आहेत. त्यामुळे कोथरुडकर मंडळी ही कलाकारच आहेत, अशी भावना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली. तर समाजाची गरज ओळखून उपक्रम आखणं ही मोदीजींची शिकवण आहे, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. आंतर सोसायटी एकांकिका स्पर्धेसारखे उपक्रम हे केवळ पुण्यासह कोथरुडमध्येच होऊ शकतात, असे कौतुकोग्दार प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी काढले.

बेल्जियममध्ये होणार ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना – सविस्तर बातमी 

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरुड विधानसभा मतदारसंघात आयोजित आंतर सोसायटी एकांकीका स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा रविवारी (दि.१०) यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात जल्लोषात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. सदीप बुटाला, कोथरुड मध्य मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर, उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, स्पर्धेचे परिक्षक यशोधन बाळ, भालचंद्र करंदीकर, अनुराधा राजहंस, संयोजक मधुरा वैशंपायन, अशुतोष वैशंपायन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

कोथरुडने कलाक्षेत्राला अनेक दिग्गज मान्यवर दिले - केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, सर्वसामान्यपणे लोकप्रतिनीधी निवडताना आपण सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवणाऱ्या व्यक्तीला निवडून देत असतो. मात्र, चंद्रकांतदादा पाटील हे केवळ नागरिकांच्या अडीअडचणी सोडवत नाहीत, तर मर्यादेच्या पलिकडे जाऊन काम करतात, ही त्यांची खासियत आहे. कोथरुडने कलाक्षेत्राला अनेक दिग्गज दिले आहेत. त्यामुळे कोथरुडकर मंडळी ही कलाकार आणि दर्दी आहेत, हे सांगण्याची गरज नाही. आंतर सोसायटीला मिळालेला उत्सफूर्त प्रतिसाद हे त्याचेच द्योतक आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, समाजाची गरज ओळखून कार्यक्रम आखणं ही माननीय मोदीजींची शिकवण आहे. ते मुख्यमंत्री असल्यापासून त्यांच्या माध्यमातून कर्णवतीमध्ये अनेक मुलांचे मोफत शिक्षण होत आहे. स्वामी विवेकानंद आणि जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी देखील समाजातील प्रत्येक व्यक्तीला सुखी समाधानी करण्यासाठी काम केलं पाहिजे, ही शिकवण दिली. त्यातूनच आदर्श घेऊन, कोथरुड विधासभा मतदारसंघात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. आंतर सोसायटी एकांकीका स्पर्धा ही त्यांपैकीच एक असल्याची भावना ना. पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. हौशी गायकांसाठी सप्टेंबरमध्ये वेगळी स्पर्धा घेण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनीही एकांकिका स्पर्धेचे मुक्तकंठाने कौतुक केले. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक कलाकार दडलेला असतो. त्यामुळे प्रत्येकाने आपले आत्मपरिक्षण केल्यास, त्याला त्याच्यातील कलेची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. कोथरुडमध्ये नाटकाचे प्रयोग यशस्वी का होतात, हे आज मला स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमामुळे लक्षात आलं. चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला आंतरसोसयटी एकांकिका स्पर्धेचा उपक्रम अतिशय स्तुत्य असून, अशा प्रकारचा उपक्रम केवळ कोथरुडमध्येच शक्य आहे, अशी भावना ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कोथरुडच्या इंद्रधनू सोसायटीने सादर केलेल्या ‘पापक्षालन’ या एकांकीकेने पहिले पारितोषिक पटकावले. तर सूस-पाषाण येथील कृष्ण-कमल सोसायटीची ‘मळभ’ एकांकिका आणि बाणेरच्या नंदन प्रॉसपेराने सादर केलेल्या हिप्पोपोटेमसचे पोस्टमार्टमला द्वितीय पारितोषिक विभागून देण्यात आले. तिसरं पारितोषिक देखील सृष्टी सोसायटीच्या ‘गुलाबी सिर’, बळवंत पूरम साम्राज्य ‘द कॉन्शन्स’ला विभागून देण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×