Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

डॉ. आंबेडकर स्मारक विस्तारीकरणासाठी प्रस्तावित जमीन विकासकाकडून पुन्हा ताब्यात

एमएसआरडीसीच्या निर्णयाचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले स्वागत

marathinews24.com

पुणे – शहरातील मंगळवार पेठ परिसरातील अंदाजे ८ हजार ९०० चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पुन्हा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात एमएसआरडीसीकडून खासगी विकासक एनजी वेंचर्स, कोरेगाव पार्क, पुणे यांना अधिकृत पत्र पाठविण्यात आले आहे. एमएसआरडीसी आणि एनजी वेंचर्स यांच्यात दिनांक ०४ सप्टेंबर २०२४ रोजी जमिनीचा भाडेपट्टा करार करण्यात आला होता. मात्र, सदर जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असल्याने सार्वजनिक हिताच्या दृष्टीने ही जमीन परत घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन आनंदात साजरा होणार – सविस्तर बातमी

महामंडळाने पाठविलेल्या पत्रानुसार, एनजी वेंचर्स यांना पत्राची प्राप्ती झाल्यापासून १५ दिवसांच्या आत खालीलपैकी कोणताही एक पर्याय निवडण्यास सांगण्यात आले आहे. पहिल्या पर्यायानुसार, कंपनीने भरलेला लीज प्रीमियम, लीज भाडे तसेच परफॉर्मन्स सिक्युरिटी डिपॉझिटची संपूर्ण रक्कम एमएसआरडीसीकडून परत करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या पर्यायानुसार, एमएसआरडीसीच्या ताब्यात असलेली अन्य कोणतीही पर्यायी जमीन वाटप करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

संबंधित जमीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी प्रस्तावित आहे. या मागणीसाठी विविध आंबेडकरवादी संघटनांनी सातत्याने पाठपुरावा व आंदोलने केली होती. या आंदोलनांची दखल घेत उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या सूचनांनुसार तसेच विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मध्यस्थीने संघटनांचे पदाधिकारी, नगरविकास विभाग, परिवहन विभाग, महसूल विभाग आदी संबंधित विभागांमध्ये वेळोवेळी बैठका घेऊन आवश्यक समन्वय साधण्यात आला.

सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याचे सदर कार्यवाहीतून स्पष्ट होत असून, संबंधित खासगी संस्थेकडून सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे. निर्णयामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता असून, सामाजिक व ऐतिहासिक दृष्टिकोनातून हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×