Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

मोटारींच्या काचा फोडून रोकडसह लॅपटॉप चोरीला

ग्राहकांकडून गोळा केलेली सव्वासात लाखांची रक्कम हडप

विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मोटारींचा काचा फोडून चोरट्यांनी ९० हजारांच्या रोकडसह लॅपटॉप मिळून २ लाख ८ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना १६ सप्टेंबरला संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास विमाननगरमधील न्याती इंप्रेस इमारतीनजीक घडल्या आहेत. याप्रकरणी विमाननगरमध्ये राहणार्‍या तरूणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फसवणूक प्रकरणी बारामतीतील दाम्पत्यावर गुन्हा दाखल – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण विमाननगरमध्ये राहायला असून, १६ सप्टेंबरला संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास त्यांनी न्याती इंप्रेस इमारतीजवळ मोटार उभी केली होती. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या मोटारीची काच फोडून ९० हजारांची रोकड चोरून नेली. दुसर्‍या मोटारीची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप चोरून नेला आहे याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे तपास करीत आहेत.

बाणेरमध्ये घरात शिरून ऐवज चोरीला

घरात शिरून चोरट्यांनी तीन हजारांची रोकड, मोबाइल, लॅपटॉप असा ७५ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना १४ सप्टेंबरला पहाटे चार ते सहा वाजण्याच्या सुमारास बाणेरमधील विठ्ठल मंदीराजवळ घडली आहे. याप्रकरणी २८ वर्षीय तरूणाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्याचा मित्र १४ सप्टेंबरला पहाटे चार ते सहा वाजण्याच्या सुमारास घरात झोपले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घरात शिरून रोकड, मोबाइल, लॅपटॉप असा ७५ हजारांचा ऐवज चोरून नेला. झोपेतून उठल्यानंतर तक्रारदाराला घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस अमलदार गायकवाड तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×