पिंपरीत प्रतिबंधित ई-सिगारेट आणि हुक्का फ्लेवरचा मोठा साठा जप्त

पिंपरीत प्रतिबंधित ई-सिगारेट आणि हुक्का फ्लेवरचा मोठा साठा जप्त

पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण ८५ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

marathinews24.com

पिंपरी – शासनाने बंदी घातलेल्या परदेशी बनावटीच्या ई-सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या दुकानावर गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारी संत तुकाराम नगर येथील ‘लाईव्ह इमारेटस’ नावाच्या दुकानात करण्यात आली.

तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक – सविस्तर बातमी 

याप्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल मितेश यादव यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अहमद यासिन हमीद शेख (वय ३५, पिंपरी, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने आपल्या दुकानात शासनाने प्रतिबंधित केलेल्या विविध कंपन्यांच्या परदेशी बनावटीच्या ई-सिगारेट, सिगारेट आणि हुक्का फ्लेवरचा साठा विक्रीसाठी ठेवला होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण ८५ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संत तुकाराम नगर पोलीस तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×