भाड्याने घेतलेली मोटारकार गहाण ठेवून मालकाकडेच मागितली खंडणी

पुण्यात जेष्ठ फळविक्रेत्या महिलेला मोफत राशनचे आमिष, अडीच लाखांना लुटले

चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

marathinews24.com

पिंपरी – भाड्याने घेतलेली मोटारकार परत न करता ती दुसऱ्याकडे गहाण ठेवून मूळ मालकाकडेच एक लाखांची खंडणी मागण्याचा प्रकार चिखलीत समोर आला आहे. ही घटना ४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३:४५ वाजण्याच्या सुमारास शिवतेजनगर, चिखली येथे घडली. याप्रकरणी निलेश भाऊराय नागरिक (वय ३६, शिवतेजनगर, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विनोद शंकर पवार (काळेवाडी, पिंपरी) आणि आदेश कोंडरे (कामशेत, मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मेफेड्रोन विक्री प्रकरणी एकास अटक – सविस्तर बातमी 

आरोपी विनोद पवार याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांची स्विफ्ट डिझायर कार भाड्याने नेली आणि ती परत केली नाही. फिर्यादीने जीपीएसद्वारे गाडीचा शोध घेतला असता ती आदेश कोंडरे याच्याकडे असल्याचे समजले. फिर्यादीने गाडी परत मागितली असता, आदेशने “विनोदने ही गाडी माझ्याकडे गहाण ठेवली आहे, जर गाडी हवी असेल तर १ लाख रुपये द्या” अशी धमकी देऊन खंडणी मागितली. चिखली पोलीस तपास करत आहेत.

तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला एक सराईत गुन्हेगार बेकायदेशीररीत्या शहरात वावरताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. ही कारवाई सोमवारी रात्री आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटावर करण्यात आली. केतन प्रकाश शिंदे (वय २२, आळंदी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस हवालदार सचिन सातपुते यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी केतन शिंदे याला पोलीस उपायुक्तांच्या आदेशानुसार २८ नोव्हेंबर २०२५ पासून दोन वर्षांसाठी पिंपरी चिंचवड, पुणे शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. असे असतानाही तो कोणतीही परवानगी न घेता आळंदी परिसरात फिरताना आढळला. झडती घेतली असता त्याच्याकडे ३०० रुपये किमतीचा एक लोखंडी कोयता मिळून आला. हद्दपारीच्या आणि मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आळंदी पोलीस तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×