मेफेड्रोन विक्री प्रकरणी एकास अटक

मेफेड्रोन विक्री प्रकरणी एकास अटक

पोलिसांनी सापळा रचून घेतले ताब्यात

marathinews24.com

पिंपरी – चऱ्होली बुद्रुक परिसरात अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी टाटा सुमो गाडीसह रंगेहात पकडले आहे. ही कारवाई मंगळवारी पहाटे धानोरी रोडवरील पिरबाबा दर्गा मंदिराजवळ करण्यात आली. याप्रकरणी पोलीस हवालदार सोमनाथ खळसोडे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. परशुराम जगन्नाथ मदने (वय ४०, लोहगाव, पुणे) याला अटक करण्यात आली आहे.

मद्यधुंद कार चालकाने डिलिव्हरी बॉयला चिरडले – सविस्तर बातमी 

आरोपी परशुराम मदने हा आपल्या टाटा सुमो गाडीत बेकायदेशीररीत्या मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ बाळगून विक्रीसाठी आला होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४७ हजार ३०० रुपये किमतीचे ५.४३ ग्रॅम एमडी, दोन मोबाईल, एक टाटा सुमो गाडी आणि रोख रक्कम असा एकूण ५ लाख ६८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिघी पोलीस तपास करत आहेत.

तळेगाव एमआयडीसी परिसरात चार हजार लिटर रसायन जप्त

पिंपरी – हातभट्टीची दारू तयार करण्याच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून हजारो लिटर कच्चे रसायन नष्ट केले आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारी आंबी गावच्या हद्दीतील कंजारभट वस्ती येथील ओढ्याकाठी करण्यात आली. याप्रकरणी पोलीस हवालदार रमेश घुले यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका महिला आरोपीच्या विरोधात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महिलेने ओढ्याच्या कडेला गावठी हातभट्टीची दारू गाळण्यासाठी ५ हजार लिटर क्षमतेच्या लोखंडी टाकीत गुळमिश्रित कच्चे रसायन साठवून ठेवले होते. पोलिसांनी धाड टाकली असता तिथे अंदाजे चार हजार लिटर रसायन मिळून आले, ज्याची किंमत दोन लाख चार हजार रुपये आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×