Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

शीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पण

शीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पण

दिव्यांग बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शीघ्र निदान, योग्य हस्तक्षेप आणि समावेशक शिक्षणावर भर

marathinews24.com

पुणे – दिव्यांग बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शीघ्र निदान, वेळेवर हस्तक्षेप आणि समावेशक शिक्षणाची भक्कम पायाभरणी करणे आवश्यक आहे. या उद्देशाने भारतीय पुनर्वास परिषद (आरसीआय) आणि दिव्यांग सक्षमीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या ‘शीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीकरिता क्रॉस डिसॅबिलिटी दिव्यांगत्व अभ्यासक्रम आराखडा’ या हस्तपुस्तिकेचे लोकार्पण नुकतेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले.

पुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!! – सविस्तर लेख 

या कार्यक्रमास राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव डॉक्टर माणिक गुरसाळ, आयुक्त महिला व बालकल्याण विभाग, माधवी सरदेशमुख, प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या सहसंस्थापिका फरिदा लांबे, राज्य प्रकल्पाचे संचालक संजय यादव, एससीइआरटी चे संचालक डॉ हेमंत वसेकर तसेच विभागातील इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

दिव्यांगत्वापेक्षा व्यक्ती म्हणून पाहण्याची गरज

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिव्यांग व्यक्तींकडे पाहताना त्यांच्या दिव्यांगत्वापेक्षा त्यांच्याकडे सर्वप्रथम व्यक्ती म्हणून पाहण्याची गरज व्यक्त केली. पालक, शिक्षक आणि समाजाने मुलाकडे प्रथम एक मूल म्हणून पाहावे आणि त्यानंतर त्याच्या दिव्यांगत्वाचा विचार करावा. दिव्यांगत्व ही व्यक्तिमत्त्वाची केवळ एक बाजू असून ती त्या व्यक्तीची संपूर्ण ओळख नसल्याचे त्यांनी सांगितले.

दिव्यांगजन विषयक विभागाच्या नावातील बदलही याच दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. ‘Department of Disability Affairs’ ऐवजी ‘Department of Empowerment of Persons with Disabilities’ असे नामकरण करून दिव्यांगत्वापेक्षा व्यक्तीच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे.

पहिले १,००० दिवस महत्त्वाचे

मुलाच्या आयुष्यातील पहिले १,००० दिवस अत्यंत महत्वाचे असतात. या कालावधीत योग्य आरोग्यसेवा, काळजी, मार्गदर्शन आणि प्रारंभिक हस्तक्षेप मिळाल्यास मुलाच्या पुढील विकासाला मोठी मदत होते. त्यामुळे पालक, प्रारंभिक हस्तक्षेप क्षेत्रातील तज्ज्ञ, आरोग्य कर्मचारी, शिक्षक आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे.
दिव्यांग व्यक्तींशी संबंधित योजना, धोरणे, भरती प्रक्रिया, शिष्यवृत्ती आणि हक्कांच्या प्रभावी अंमलबजावणीसोबतच या क्षेत्रात सकारात्मक, प्रगत आणि व्यक्तिकेंद्रित दृष्टिकोन विकसित करण्याची आवश्यकता असल्याचेही मुख्य सचिव अग्रवाल यांनी यावेळी नमूद केले.

पूर्णतः दृष्टिदिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ब्रेल महत्त्वाचे असले तरी शिक्षण केवळ ब्रेलपुरते मर्यादित न ठेवता ऐकणे, बोलणे, स्पर्शातून शिकणे आणि प्रत्यक्ष कृती यांचा प्रभावी वापर करावा. दृष्टिदिव्यांग विद्यार्थी गणित, विज्ञान, अभियांत्रिकी यांसारख्या क्षेत्रांत पुढे जाऊ शकत नाहीत, ही धारणा बदलण्याची गरज असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले..

या हस्तपुस्तिकेत ० ते ३ वर्षे वयोगटासाठी Developmentally Appropriate Practice (DAP) आधारित ‘पहल (PEHAL)’ आराखडा विकसित करण्यात आला आहे. तसेच ३ ते ६ वर्षे वयोगटासाठी NIPUN Inclusive अंतर्गत समावेशक शाळापूर्व शिक्षणासाठी कृती पाठांचा समावेश करण्यात आला आहे. बालकांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक आणि सामाजिक विकासासाठी पंचकोश संकल्पनेचा ही अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

विकासाच्या पाच क्षेत्रांवर लक्ष
‘पहल’ अभ्यासक्रमात शिकण्याचा दृष्टिकोन, सामाजिक-भावनिक शिक्षण, संप्रेषण-भाषा व साक्षरता, शारीरिक विकास व आरोग्य आणि बोधात्मक विकास या पाच प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे. वयोगटानुसार अपेक्षित विकासात्मक टप्पे तक्त्यांच्या स्वरूपात मांडण्यात आले आहेत.

हे टप्पे बालकांची परस्पर तुलना करण्यासाठी नसून त्यांच्या विकासाची सद्यस्थिती समजून घेण्यासाठी पालक आणि व्यावसायिकांना मार्गदर्शन करणारे आहेत. विकासात विलंब किंवा अडचणी आढळल्यास वेळेत आवश्यक हस्तक्षेप करता यावा, हा या आराखड्याचा प्रमुख उद्देश आहे. तसेच क्रॉस डिसॅबिलिटी दृष्टिकोनातून समावेशक शिक्षणाला चालना क्रॉस डिसॅबिलिटी दृष्टिकोनामुळे विविध प्रकारच्या दिव्यांगत्वांमध्ये भेद न करता समान गरजा लक्षात घेऊन समावेशक नियोजन करता येणार आहे. युनिव्हर्सल डिझाईन फॉर लर्निंगच्या संकल्पनेवर आधारित कृती पाठांमुळे विविध क्षमतांच्या बालकांना त्यांच्या गरजेनुसार शिकण्याच्या समान संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे.

हस्तपुस्तिकेत तीन प्रमुख विभागांचा समावेश आहे. शीघ्र निदान, योग्य हस्तक्षेप, पालकांचे सक्षमीकरण आणि शाळापूर्व तयारी यांचा समन्वय साधणारा हा अभ्यासक्रम आराखडा दिव्यांग बालकांसह सर्व बालकांच्या समावेशक शिक्षणाची पायाभरणी अधिक मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×