Breking News
केसांचा टोप लाउन घरफोड्या, सराईत टोळीचा पर्दाफाशविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा शिवाजीनगर येथील केदारनाथ मंदिरात अभिषेक, आरती व दर्शन

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा शिवाजीनगर येथील केदारनाथ मंदिरात अभिषेक, आरती व दर्शन

देवस्थानच्या विश्वस्त मंडळातर्फे डॉ. गोऱ्हे यांचा सन्मानपूर्वक सत्कार

marathinews24.com

पुणे – विधान परिषदेच्या उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज शिवाजीनगर येथील प्रसिद्ध केदारनाथ मंदिरात अभिषेक करून आरती केली आणि भगवान केदारनाथांचे दर्शन घेतले. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला भाविकांची मोठी उपस्थिती होती.

फुफ्फुसांच्या आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या कबुतरांना अनियंत्रित दाणे टाकणे टाळाच – सविस्तर बातमी 

अभिषेक व आरतीनंतर देवस्थानच्या विश्वस्त मंडळातर्फे डॉ. गोऱ्हे यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी मंदिर परिसरातील धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याची माहिती जाणून घेतली तसेच भाविकांच्या सोयीसुविधांसाठी उपयुक्त असे काही मुद्दे अधोरेखित केले.

डॉ. गोऱ्हे यांनी भगवान केदारनाथांच्या चरणी महाराष्ट्रातील जनतेच्या सुख-समृद्धीची प्रार्थना केली. तसेच समाजहितासाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वतःच्या कार्यातून सातत्याने योगदान देण्याचा संकल्प पुन्हा दृढ केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×