Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

बीडच्या जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट बंद; रुग्णांची हेळसांड

रुग्णाला वार्डात नेण्यासाठी नातेवाईकांना होतोय त्रास

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – जिल्हा रुग्णालयातील लिफ्ट बंद असल्यामुळे गंभीर रुग्णांना तिसऱ्या मजल्यावरील वार्डात दाखल करताना नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याने जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे .रुग्णालयातील शिपाईही मदत करीत नसल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सतत लिफ्ट बंद पडण्याचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी असून, लिफ्ट तात्पुरती दुरुस्ती करुन वेळ मारुन नेली जात आहे.

सोमवार पेठेत भरदिवसा घरफोडी;३ लाखांचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी

जिल्हा रुग्णालयात दुसऱ्या मजल्यावर अस्थिरोग आणि महिला वार्ड आहेत. अस्थिरोग वार्ड वरच्या मजल्यावर असल्याने अपघातातील जखमी रुग्णांना वरच्या मजल्यावर घेऊन जाण्यासाठी नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णांना चक्क झोळी करुन वर अथवा खाली घेऊन जावे लागत आहे. गंभीर अजारी महिलांना ही अशाच प्रकारे न्यावे लागत आहे. अशा रुग्णांना वार्डात घेऊन जाण्यासाठी अथवा खाली घेऊन येण्यासाठी कर्मचारी मदत करीत नाहीत. रुग्णांचे नातेवाईक उपस्थित नसल्यास तर त्यांना दवाखान्यात फिरुन इतरांची मदत घ्यावी लागते. त्यामुळे मोठी गैरसोय होताना पाहायला मिळत आहे. व्हिलचिअर मिळाली तर पायऱ्यावरुन ओढत नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. असे हाल नेहमीचे झाले असून, सततच ही लिफ्ट बंद पडत आहे. लिफ्ट तात्पुरती दुरुस्ती करून ती सुरु करण्यात येते.

जिल्हा रुग्णालय प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून या लिफ्टचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा अशी मागणी होत आहे. तिसऱ्या मजल्यावरून रुग्णाला आणले पण एका महिला रुग्णाला डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्याचे सांगितले होते. लिफ्ट बंद असल्यामुळे नातेवाईकांनी संबंधित महिला रुग्णाला तिसऱ्या मजल्यावरुन स्ट्रेक्चर डोक्यावर घेऊन खाली घेऊन आले. पण खाली येताच सोनाग्राफी करणाऱ्या परिचारिकेने वेळ संपल्याचे कारण सांगून कुलूप लावून जाणे पसंत केले. यामुळे येथे कर्मचाऱ्यांमध्ये माणुसकी शिल्लक राहिली नाही. कर्मचाऱ्यांची मनमानी वाढली का? असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे अशा कर्मचाऱ्यांकडे सीएस सोळंके यांनी लक्ष देण्याची मागणी रूग्णानकडून आणि त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×