‘लंपी’ चर्मरोगाच्या अनुषंगाने पशुपालकांनी घाबरून जाऊ नये

‘लंपी’ चर्मरोगाच्या अनुषंगाने पशुपालकांनी घाबरून जाऊ नये; जनावरांचे लसीकरण करून घेण्याचे पशुसंवर्धन आयुक्तांचे आवाहन

जनावरांचे लसीकरण करून घेण्याचे पशुसंवर्धन आयुक्तांचे आवाहन

marathinews24.com

पुणे – राज्यातील एकूण गोवंशीय पशुधनाच्या तुलनेत लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव अत्यल्प असून पशुपालकांनी घाबरून न जाता जनावरांचे लसीकरण करुन घ्यावे आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले आहे.

अभिनेता अक्षयकुमार आणि अर्शद वारसी यांना पुणे न्यायालयाचा दणका – सविस्तर बातमी 

डॉ. देवरे यांनी पुढे माहिती दिली, राज्यातील १ कोटी ३९ लाख गोवंशीय पशुधनाच्या तुलनेत लंपी चर्मरोगाने ११ हजार ८४३ पशुधन बाधित असून ही टक्केवारी केवळ ०. ०८ टक्के इतकी अत्यल्प आहे. यापैकी ८ हजार ३३० जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. तर आतापर्यंत ४०३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत तात्काळ व प्रभावी नियंत्रण उपाययोजना राबविल्या जात आहेत. राज्यात ९३ टक्के पेक्षा जास्त गोवंशीय पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

राज्यात लंपी चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर बाधित जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेतील ७३ आणि केंद्र पुरस्कृत पशुस्वास्थ्य व रोग नियंत्रण योजनेतील ८० अशी एकूण १५३ फिरती पशुचिकित्सा पथके वैद्यकीय सेवा देत असून पशुपालकांमध्ये रोगाविषयी जनजागृती करण्यात येत आहे.

सध्यस्थितीत २५ जिल्ह्यात लंपीचा प्रादुर्भाव आढळून आला असून पुणे, सातारा, सोलापूर, अहिल्यानगर, बुलडाणा व जळगाव जिल्हे हे सर्वाधिक बाधित आहेत. सोलापूर जिल्ह्यातील वाढत्या प्रादूर्भावाच्या अनुषंगाने रोग नियंत्रण व रोग अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंढरपूर, माळशिरस, सांगोला, अक्कलकोट आणि मंगळवेढा येथील लम्पी बाधित मुख्य भागाला (एपीसेंटर) भेट दिली व आढावा घेऊन पशुपालक आणि संबंधित संस्थाप्रमुखांना मार्गदर्शन केले. मुंबई येथील प्रादेशिक सहआयुक्तांनी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील तळेबाजार व वाडा येथे आयोजित लसीकरण शिबीरांना भेट देऊन पशुपालकांशी संवाद साधला.

पशुसंवर्धन विभागाने या रोग प्रादुर्भावाचा साथरोग विषयक अभ्यास करुन रोग प्रतिबंधक लसीकरणाचा समावेश मान्सून पूर्व लसीकरण कार्यक्रमामध्ये केला आहे. या करिता ११९ लाख लस मात्रा व अनुषंगिक साहित्याचा पुरवठा पावसाळा सुरु होण्यापूर्वी करण्यात आला आहे. प्रादुर्भावग्रस्त भागात उपचार, कीटक नियंत्रण व जनजागृती मोहीम सुरु असल्याचेही डॉ. देवरे यांनी नमूद केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×