Breking News
Shivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळाMobile Theft in Pune : नवले पुलाजवळ तरुणाचा मोबाइल हिसकावलाPune Bank Fraud Case : नियमबाह्य कर्ज प्रकरणात बँकेची ४ कोटी ४६ लाखांची फसवणूकPune Road Accident News : लोणी काळभोरमध्ये ट्रकवर मोटार आदळली; मोटार चालक मृत्युमुखीNavi Peth Crime News : आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खुनाचा प्रयत्नWarje Crime News : गांजा विक्री करणारी महिला अटकेतMaharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर

महा ई-सेवा केंद्रामुळे नागरिक, अधिवक्ता आणि न्यायालयामधील दुवा अधिक मजबूत होण्यास मदत – महेंद्र के. महाजन

महा ई-सेवा केंद्रामुळे नागरिक, अधिवक्ता आणि न्यायालयामधील दुवा अधिक मजबूत होण्यास मदत - महेंद्र के. महाजन

नागरिक, अधिवक्ता आणि न्यायालय यांच्यातील दुवा अधिक मजबूत होण्यास मदत होईल – महेंद्र के. महाजन

marathinews24.com

पुणे – तंत्रज्ञान हे आजच्या न्यायव्यवस्थेचे आधारस्तंभ असून महा ई-सेवा केंद्रामुळे माहिती मिळविण्याची गती वाढेल, पारदर्शकता टिकून राहील आणि न्याय मिळविण्याचा कालावधी कमी होईल, या केंद्रामुळे नागरिक, अधिवक्ता आणि न्यायालय यांच्यातील दुवा अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन महयांनी केले.

लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेसचा लढा- काँग्रेस राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला – सविस्तर बातमी 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने ई-कोर्ट इंडिया प्रकल्पाअंतर्गत जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर येथे महा ई-सेवा केंद्राचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे, बी. वी. वाघ, ए. एल. टिकले, पुणे बार अशोसिएशनचे अध्यक्ष हेमंत झंझाड, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पॅरा लीगल व्हॉलंटियर्स आदी उपस्थित होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील म्हणाल्या, महा ई-सेवा केंद्र हे न्यायाला सुलभतेने प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचे एक सशक्त माध्यम आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व घटकांना विशेषतः न्यायालयात प्रत्यक्ष येऊ न शकणाऱ्या नागरिकांना या केंद्राचा मोठा लाभ होणार आहे, असे त्या म्हणाल्या.

महा ई-सेवा केंद्राचे एकाचवेळी जिल्हा व सत्र न्यायालय दिवाणी न्यायालय आणि लघुउद्योग न्यायालय येथे उद्धाटन करण्यात आले असून याठिकाणी न्यायालयीन सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानयुक्त उपलब्ध होणार आहेत. या केंद्राच्या माध्यमातून नागरिक, अधिवक्ता, न्यायालयीन कर्मचाऱ्यांना प्रकरणांची माहिती, ई-फायलिंग, निकालपत्रे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, ई-भेटी, ई-कोर्ट मोबाईल अॅपबाबत मार्गदर्शन तसेच इतर संगणकीय सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

यावेळी जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा संगणक विभागाचे प्रमुख एस. एस. कंठाले यांनी महा-ई सेवा केंद्रामार्फत न्याय सेवा अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येतील, असे सांगून त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×