Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Mahalaxmi Shree Sukt Pathan : श्रीसूक्त पठणातून पुणेकरांनी केली श्री महालक्ष्मी देवीची स्तुती

Mahalaxmi Shree Sukt Pathan

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव; श्रीसूक्त व अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

marathinews24.com

पुणे – Mahalaxmi Shree Sukt Pathan : माता माता की जय… चा नामघोष, शंख वादनाचा निनाद आणि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्त्रजाम्, चंद्रा हिरण्यमीं लक्ष्मीं जातवेदो म आवह… च्या स्वरांनी श्री महालक्ष्मी मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. नवरात्र उत्सवातील द्वितीयेची पहाट शेकडो महिला व पुरुषांनी सामुहिकरित्या केलेल्या श्रीसूक्त आणि श्री गणपती अथर्वशीर्ष पठणाद्वारे मंगलमय झाली.

Mahalaxmi Shree Sukt Pathan
Mahalaxmi Shree Sukt Pathan

घोडेगाव येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात ‘खुले ग्रंथालय व पुस्तक परिचय’ उपक्रम – सविस्तर बातमी 

निमित्त होते, श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात झालेल्या सामूहिक श्रीसूक्त पठण कार्यक्रमाचे. यावेळी डॉ. सतिश देसाई, मंदिराच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, ॲड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर यांसह विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते. ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.

कार्यक्रमास पारंपरिक वेशात उपस्थित महिलांनी जय माता दी… च्या जयघोष करीत आसमंत दणाणून सोडला. (Mahalaxmi Shree Sukt Pathan) पठणाची सुरुवात शंखनाद पथकातील वादकांच्या शंखवादनाने झाली. श्रीसूक्त म्हणजे काय? त्याचे महत्व आणि महती याविषयी देखील उपस्थितांना माहिती देण्यात आली. त्यानंतर ओंकार, अथर्वशीर्षाचा एक पाठ आणि श्री सूक्ताचे तीन पाठ असे सामुदायिकरित्या पठण करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता आरतीने झाली.

विश्वस्त डॉ. तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, सामुहिक श्रीसूक्त पठणाच्या माध्यमातून महिला शक्तीने एकत्र येऊन स्त्री शक्तीचा जागर करावा, हा उद्देश दरवर्षी असतो. नवरात्रोत्सवाच्या पवित्र पर्वात श्री महालक्ष्मी देवीची आराधना, भक्तिभाव आणि आध्यात्मिक वातावरणाची अनुभूती देणाऱ्या या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात.

त्या पुढे म्हणाल्या, श्रीसूक्त हे ऋग्वेदातील श्री महालक्ष्मी देवीच्या स्तुतीस समर्पित पवित्र वैदिक स्तोत्र आहे. सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती आणि कल्याण यांचे प्रतीक असलेल्या देवी महालक्ष्मीच्या उपासनेत श्रीसूक्त पठणाला विशेष महत्त्व आहे. सामूहिक पठणातून भक्ती, सकारात्मक ऊर्जा आणि सामूहिक मंगलभावनेचा संदेश देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×