Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

बँकेत गोंधळ घालून व्यवस्थापकाला शिवीगाळ

लक्ष्मी रस्त्यावर महिलेच्या पिशवीतून दागिने चोरीला

खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – बँकेत गोंधळ घालून कर्मचारी, तसेच व्यवस्थापाकाला शिवीगाळ करण्यात आल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. या प्रकरणी खडक पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी राहुल राजू वाघरेशा (वय २८), राजू वाघरेशा (वय ५८, दोघे रा. गोमराज व्हिला, गुलटेकडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बँक व्यवस्थापक श्रीआंश श्रीदेव सिंग (वय ३९, रा. राॅयल एनरिच सोसायटी, भोसले गार्डन, हडपसर ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शासकीय कामात अडथळा आणणे, तसेच धक्काबुक्की केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

टोळक्याकडून पोलीस शिपायाला धक्काबुक्की – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे भवानी पेठेतील कल्पतरु प्लाझा येथील एका राष्ट्रीयकृत बँकेत व्यवस्थापक आहेत. आरोपी सोमवारी (१३ एप्रिल) दुपारी दी़डच्या सुमारास बँकेत आले. बँकेतील कर्मचाऱ्यांना त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी हे बँक व्यवस्थापक सिंग यांच्या दालनात शिरुन त्यांना मारण्याच्या प्रयत्नात होते. सिंग यांनी या घटनेची माहिती बँकेतील सुरक्षारक्षक सोमनाथ जगताप यांना दिली. आरोपींनी सुुरक्षारक्षक जगताप यांना धक्काबुक्की करुन जिवे मारण्याची धमकी दिली, असे सिंग यांनी फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक दाढे तपास करत आहेत. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×