Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Maharashtra Vehicle Inspection : महाराष्ट्राबाहेरील खासगी वाहनांच्या तपासणीसाठी परिवहन विभागाची विशेष मोहीम

Maharashtra Vehicle Inspection : महाराष्ट्राबाहेरील खासगी वाहनांच्या तपासणीसाठी परिवहन विभागाची विशेष मोहीम

पुण्यात परिवहन विभागाची १७ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम

marathinews24.com

पुणे – Maharashtra Vehicle Inspection : महाराष्ट्र राज्याबाहेर नोंदणीकृत असून महाराष्ट्रात नियमितपणे वापरल्या जाणाऱ्या खासगी वाहनांची तपासणी करण्यासाठी परिवहन विभागामार्फत १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे वाहनांची नोंदणी, करभरणा आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी सुरु आहे.

पुढील २५ वर्षात आरोग्यदायी अन्नाचे सर्वात मोठे आव्हान-पद्मश्री पोपटराव पवार – सविस्तर बातमी 

मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील कलम ४७ अन्वये, एका राज्यात नोंदणीकृत वाहन दुसऱ्या राज्यात एक वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी वापरले जात असल्यास संबंधित राज्यात वाहनाची पुनर्नोंदणी करून विहित मोटार वाहन कर भरणे आवश्यक आहे. तसेच, महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील तरतुदींनुसार आवश्यक माहिती व कागदपत्रे सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे.

Maharashtra Vehicle Inspection या पार्श्वभूमीवर पुणे शहर व परिसरात महाराष्ट्राबाहेरील नोंदणी क्रमांक असलेल्या आणि नियमितपणे वापरल्या जाणाऱ्या खासगी वाहनांची विशेष तपासणी करण्यात आली असून ५ ते १२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत केलेल्या कारवाईनुसार, १३४ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. ३७ वाहनांवर दोष आढळले आहेत. तीन वाहने अटकावून ठेवण्यात आली असून २१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

पुणे शहरातील नागरिक व वाहनधारकांनी आपल्या वाहनांची नोंदणी, कर आणि इतर संबंधित कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत. तसेच, परिवहन विभागाच्या तपासणीस आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×