खेलो इंडियाच्‍या सायकलिंग ट्रॅकवर महाराष्ट्राची पदक अष्ठमी

सिध्दी, मंगेशला सुवर्ण, आदिती, सिध्देश, मंथनला रौप्‍य, योगेश्वरी, सायलीला कांस्य

marathinews24.com

जयपूर – खेलो इंडिया विद्यापीठ स्‍पर्धेतील सायकलिंग ट्रॅकआज महाराष्ट्राच्‍या जयघोषाने दुमदुमला. पुणे विद्यापीठाच्‍या सिध्दी शिर्के, मंगेश ताकमोगे यांनी सुवर्णपदके जिंकून दिवस गाजविला. आदिती डोंगरे, सिध्देश, पाटील, मंथन लाटे यांनी रौप्‍य तर कोल्‍हापूरच्‍या योगेश्वरी कदम १, सायली आंरडेने २ कांस्य पदक जिंकून महाराष्ट्रासाठी पदकाची अष्टमी साजरी केली.

कथक नृत्यांगना श्रद्धा मुखडे हिला युवा पुरस्कार – सविस्तर बातमी

सवाई मानसिंग क्रीडा संकुलातील सायकलिंग ट्रॅकवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या खेळाडूंनी सायकलिंग स्‍पर्धेची सुवर्ण सांगता केली. २० कि.मी पॉईंट शर्यतीत पुणे विद्यापीठाच्‍या सिध्दी शिर्केने आपली हुकूमत गाजवली. १९ वर्षीय सिध्दीने ६५ गुणांची कमाई करीत सुवर्णयश संपादले. लव्‍हली विद्यापीठाच्‍या रिंकु भानूने ३८ गुणांसह रौप्‍य तर कोल्‍हापूर विद्यापीठाच्‍या योगेश्वरी कदमने २७ गुणांची कमाई करीत कांस्य पदकावर नाव कोरले. महिन्‍या भरापूर्वी झालेल्‍या हाताच्‍या दुखापतीवर मात करीत सिध्दीने खेलो इंडियातील पहिले पदक जिंकण्याचा करिश्मा घडविला.

पुरूषांच्‍या ५ फेऱ्यांच्‍या इलीट शर्यतीत पुणे विद्यापीठाने मक्‍तेदारी प्रस्‍थापित केली. मंगेश ताकमोगेने सुवर्ण तर मंथन लाटे रौप्‍यपदकावर नाव कोरले. अपेक्षेप्रमाणे मंगेश व मंथनने सुरूवातीपासून आघाडी घेत पदकाची कमाई केली. लव्‍हली विद्यापीठाच्‍या अजय बिश्नोईला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

खेलो इंडिया विद्यापीठ स्‍पर्धेचे पाचवे पर्व राजस्थानमधील सात शहरांमध्ये रंगली आहे. देशातील २२२ विद्यापीठांमधील ४,४४८ खेळाडू २३ पदक स्पर्धांमध्ये भाग घेत आहेत. राजस्थान सरकारच्‍या राज्य क्रीडा परिषदेच्या सहकार्याने भारतीय क्रीडा प्राधिकरण स्‍पर्धेचे संयोजन केले आहे. साययलिंगमधील महाराष्ट्राच्‍या पदक विजेत्‍यांचे विजेत्‍या खेळाडूचे प्रशिक्षक राहूल भोसले, वैभव भोर, अजय मराठे यांनी मैदानात उपस्‍थित राहून कौतुक केले आहे.

पुरूषांच्‍या २० कि.मी पॉईंट शर्यतीत कोल्‍हापूरच्‍या सिध्देश, पाटीलचे सुवर्णपदक १ गुणाने हुकले. ४२ गुणांसह केरळ विद्यापीठाच्‍याआदित्‍य संकरने सुवर्ण पटकावले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्‍व करताना सिध्देशने ४१ गुणांची कमाई करीत रूपेरीयशासह खेलो इंडिया स्‍पर्धेत पदकाची हॅटट्रिक साधली. अमृतसर स्‍पर्धेत कांस्य, ओरीसा स्‍पर्धेत रौप्‍य आता राजस्‍थान स्‍पर्धेत तो पुन्‍हा रौप्‍य पदकाचा हक्‍कदार ठरला. महिलांच्‍या स्क्रैच प्रकारात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून खेळताना आदिती डोंगरेने 28:06.613 मिनिटांची वेळ नोंदवून रूपेरी यश संपादन केले. तिचे आई-वडिल पुण्यात वृत्तवत्र विक्रेते आहेत. पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीत तीला दिपाली पाटील यांचे मार्गदर्शन मिळत आहे. कोल्‍हापूर विद्यापीठाच्‍या सायली आरंडेने दोन कांस्य पदकाची कमाई केली. सायलीने ट्रॅक सायकलिंग २०० मीटर स्प्रिंट व ५०० मीटर टाईम ट्रायल प्रकारात कांस्य पदके जिंकली आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×