Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

महाराष्ट्राच्‍या गाथा खडके, शर्वरी शेंडेला कांस्य

महाराष्ट्राच्‍या गाथा खडके, शर्वरी शेंडेला कांस्य

जागतिक तिरंदाजी स्पर्धा

marathinews24.com

पुणे – जागतिक तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या गाथा खडके, शर्वरी शेंडेने जियाना कुमारच्‍या साथीने ऐतिहासिक कांस्यपदकाचा कामगिरी केली आहे. अमेरिकेच्या संघाचा ६-० ने दणदणीत विजय नोंदवून १८ वर्षांखालील रिकरर्व्ह प्रकारात भारतीय मुलींनी कांस्यपदकाचा पराक्रम केला आहे. पात्रता फेरीत भारत चौथ्या स्‍थानावर होता. उपउपांत्‍यपूर्व फेरीत मेक्सिको संघावर ६-० ने सेटने पराभव करून स्‍पर्धेत विजयी सलामी दिली. उपांत्‍यपूर्व लढतीत बलाढ्य जपान संघाचा 5-3 सेटने पराभव भारताने उपांत्‍य फेरीत मुसंडी मारली होती. उपांत्‍य फेरीत कोरिया संघाने भारताला कडवी झुंज दिली. ६-२ सेटपर्यंत लढत रंगली. अखेर 1 गुण फरकाने कोरियाने निसटता विजय संपादन केला.

पुण्यात रूपरंगी जुगलबंदीत रसिक मंत्रमुग्ध – सविस्तर बातमी 

कॅनडा येथे सुरु असलेल्या स्पर्धेत कांस्य पदकाच्‍या लढतीत अमेरिकेला भारताने एकाही विजयाची संधी दिली नाही. ५५-५३, ५९-५६, ५५-५२ गुणांसह ६-० सेटने भारताने ऐतिहासिक कांस्य पदकाचर मोहर उमटवली. भारतीय संघांचे प्रशिक्षक प्रा रणजित चामले हे संघांचे प्रशिक्षक होते. रणजीत सरांच्‍या प्रोत्‍साहनामुळे हे यश हाती आले असे सोलापूरच्‍या गाथा खडके हीने सांगितले. कांस्य पदक विजेता संघात सोलापूरच्‍या गाथा खडके, पुण्याच्‍या शर्वरी शेंडेसह चंदिगडच्‍या जियाना कुमार हीचा समावेश होता.

खेळाडूंच्या मदतीसाठी धावले मंत्री

कॅनडाला रवाना होण्यासाठी भारतीय संघांचे विमाना १५ ऑगस्‍टला होते. परंतु एअर कॅनडाचा संप झाल्यामुळे भारताच्या संघ 4 दिवस विमानतळावरच अडकून पडला होता. भारतीय तिरंदाजी संघटना आणि साईने यांनी विशेष प्रयत्न केले. अखेर महाराष्ट्राचे केंद्रिय राज्‍यमंत्री रक्षाताई खडके आणि मुरलीधर मोहोळ खेळाडूंच्‍या मदतीला धावले. या मराठमोळ्या मंत्र्यांच्‍या प्रयासाने प्रयत्न खेळाडूंना वेळेवर कॅनडाला रवाना झाले. संघाचे मार्गदर्शक रणजीत चामले हे स्पर्धेच्या दिवशी पहाटे साडेचार वाजता कॅनडात पोचलले. नाट्यमय घडामोडीनंतर भारतीय संघाने ही कामगिरी केली केल्‍याने क्रीडा मंत्रालय व साईकडून खेळाडूंचे कौतुक होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×