Breking News
रॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खून

रुजवू मराठी, फुलवू मराठी” संकल्पनेतून मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

नवोदय इंटरनॅशनल स्कूलमध्ये मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा

marathinews24.com

पुणे – नवोदय इंटरनॅशनल स्कूलमध्ये “रुजवू मराठी, फुलवू मराठी” या संकल्पने अंतर्गत मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात मराठी संस्कृतीची ओळख आणि भाषेची गोडी विद्यार्थ्यांना अनुभवता आली. कार्यक्रमाची सुरुवात संपूर्ण मराठीत घेण्यात आलेल्या विशेष शालेय सभेने झाली. पारंपरिक दीपप्रज्वलनाने उत्सवाची मंगल सुरुवात केली. यावेळी रेखा श्रीवास्तव आणि मंगल हंबर्डे यांनी कवी कुसुमाग्रज यांच्या जीवन कार्याचा व मराठी साहित्यातील त्यांच्या योगदानाचा आढावा घेतला. ज्योती सोनकर यांनी विद्यार्थ्यांसोबत मराठी कविता म्हणत संत साहित्याचे महत्त्व पटवून दिले.

रुग्ण हक्क परिषदेचा शिवसन्मान पुरस्कार प्रेरणादायी – सविस्तर बातमी

विद्यार्थ्यांना सक्रिय सहभागासाठी आवाहन केले. स्वाती घालमे यांनी कविता सादर केली, तर कोमल कुऱ्हाडे यांनी मराठी भाषेविषयी प्रश्नोत्तरांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला. आई-आज्जींच्या गोष्टी”, गीते, अभंग तसेच विविध स्पर्धांमुळे कार्यक्रमाला रंगत आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत मराठी भाषेबद्दलचे आपले प्रेम व्यक्त केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×