Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

छळास कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

छळास कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

केज तालुक्यातील उंदरी येथील घटना

marathinews24.com

बीड – सासरच्या लोकांनी केलेल्या छळास कंटाळून केज तालुक्यातील उंदरी येथील २५ वर्षीय विवाहितेने पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे . घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे. याप्रकरणी सासरच्या मंडळींविरोधात युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बडतर्फ आयएएस पूजा खेडकरच्या आईचा शस्त्र परवाना रद्द – सविस्तर बातमी 

लातूर जिल्ह्यातील आजरखेडा (ता. रेणापूर) येथील प्रकाश सूर्यवंशी यांची मुलगी अरुणाचा विवाह १६ ऑगस्ट २०१९ रोजी उंदरी (ता. केज) येथील उद्धव ठोंबरे याच्याशी झाला होता. विवाहाच्या वेळी उद्धव ठोंबरे बँकेत नोकरी करत होते, मात्र नंतर त्यांनी नोकरी सोडून शेती व्यवसाय सुरू केला. दाम्पत्याला राजनंदिनी (वय ५) तसेच आर्या व अपूर्वा (वय ४) अशा दोन जुळ्या मुलींसह तीन मुली झाल्या. त्या कारणावरून सतत अरुणा हिचा पती उद्धव ठोंबरे दारूच्या नशेत तिला शिवीगाळ व मारहाण करीत असल्याचा आरोप आहे. सासू इंदूबाई ठोंबरे व सासरे उत्तम ठोंबरे हेही ‘आम्हाला मुलगा हवा होता, तू आमचा वंश बुडविलास असे म्हणून तिचा अपमान करत मानसिक छळ करीत होते. छळाबाबत अरुणा ठोंबरे हिने व आपल्या आई- वडील, भाऊ गोविंद सूर्यवंशी तसेच मोठी बहीण करुणाला फोनवरून सांगितले होते.

सासरच्या त्रासामुळे तिला सासरी नांदण्याची इच्छा नसल्याचे ती वारंवार सांगत होती. मात्र माहेरच्या मंडळींनी तिची समजूत काढून तिला धीर देण्याचा प्रयत्न केला होता. अखेर मानसिक छळाला कंटाळून अरुणा ठोंबरे हिने १० जानेवारीला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उंदरी येथील राहत्या घरी तिने साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अरुणा ठोंबरे हिचा भाऊ गोविंद सूर्यवंशी यांच्या तक्रारी वरून युसुफवडगाव पोलिस ठाण्यात उद्धव ठोंबरे, त्याची आई इंदुबाई ठोंबरे आणि उत्तम वडील ठोंबरे यांच्याविरुद्ध गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत बरडे हे करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×