सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पती, सासू-सासऱ्यांसह ७ जणांना अटक

marathinews24.com

पुणे – पतीसह सासू-सासरे यांच्याकडून सतत होणाऱ्या शिवीगाळ तसेच मारहाण व जाचाला कंटाळून ३३ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीसह सात जणांना अटक केली आहे. ही घटना अप्पर बिबवेवाडी परिसरात घडली आहे. सुवर्णा सर्जेराव जाधव (वय ३३, रा. शेळके वस्ती, बिबवेवाडी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती सर्जेराव जाधव, सासरे माणिक भाऊ जाधव (वय ७०), सासू जयश्री माणिक जाधव (वय ६५), लक्ष्मी रामचंद्र कांबळे (वय ४०), पुष्पा दयानंद लोंढे (वय ३५), रोहन दयानंद लोंढे (वय २२), अनुराधा माणिक जाधव (वय ३२) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ५० वर्षीय महिलेने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; १० गुन्हेगार जिल्ह्यातून तडीपार – सविस्तर बातमी 

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मुलीचा सर्जेराव याच्याशी २०१६ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर ती सासरी नांदत होती. जाधव कुटूंब अप्पर बिबवेवाडी येथील शेळके वस्तीत राहण्यास होते. विवाहाच्या काही वर्षानंतर मात्र, पती तसेच सासरच्या लोकांकडून सतत त्यांना छोट्या-मोठ्या कारणावरून छळ सुरू केला. वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण केली. तिचा मानसिक व शारिरीक छळ केला. या त्रासाला कंटाळून सुवर्णा हिने दोन दिवसांपुर्वी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली, असे दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदकरून तत्काळ पतीसह सात जणांना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक बाळु चोपडे हे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×