Breking News
Pune Crime News : धक्का लागल्यामुळे तरुणावर केला गोळीबारConstitution Day Rally Pune 2026 : संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्नAccident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमक

Matang Reservation Protest : मातंग समाजाचा २९ सप्टेंबरला मुंबईत आरक्षण उपवर्गीकरणासाठी एल्गार महामोर्चा

Matang Reservation Protest : मातंग समाजाचा २९ सप्टेंबरला मुंबईत आरक्षण उपवर्गीकरणासाठी एल्गार महामोर्चा

पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातून ५० हजार समाजबांधव सहभागी होणार; पुण्यात पत्रकार परिषदेत घोषणा

marathinews24.com

पुणे – अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अ, ब, क, ड अथवा लाभधारक आणि लाभवंचित अशा पद्धतीने उपवर्गीकरण तातडीने लागू करण्याच्या मागणीसाठी मातंग समाजाने आता मुंबईत एल्गार (Matang Reservation Protest) पुकारला आहे. २९ सप्टेंबर रोजी मंत्रालयावर धडक देणाऱ्या महामोर्चात राज्यभरातून लाखो समाजबांधव सहभागी होणार असून, पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून किमान ५० हजार समाजबांधव सहभागी होतील, अशी घोषणा गुरुवारी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.

महाराष्ट्रात अटल पेन्शन योजनेच्या नोंदणीला गती देण्यासाठी जनजागृती कार्यक्रम संपन्न – सविस्तर बातमी 

सर्वोच्च न्यायालयाच्या १ ऑगस्ट २०२४ रोजीच्या अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भातील निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उपवर्गीकरणाची प्रक्रिया तातडीने राबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

(Matang Reservation Protest)  मातंग समाजाच्या विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि आरक्षणाशी संबंधित प्रश्नांसाठी राज्यभरात आतापर्यंत ७७ मोठे मोर्चे काढण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. मात्र, आता या सर्व आंदोलनांची पुढची दिशा म्हणून २९ सप्टेंबरच्या मुंबई महामोर्चात राज्यातील मातंग समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

पत्रकार भवन, नवी पेठ येथे झालेल्या पत्रकार परिषदेला माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार अमित गोरखे, आमदार सुनील कांबळे, क्रांतिगुरू लहुजी शक्ती सेनेचे विष्णूभाऊ कसबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुभाष जगताप, पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे स्वागताध्यक्ष अनिल हातागळे आणि सचिव अॅड. महेश सकट, लहुजी स्मारकाचे अध्यक्ष अशोक लोखंडे ,नगरसेवक प्रसेनजित वैरागे,भास्कर नेटके यांच्यासह विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांमधील मातंग समाजाचे प्रमुख नेते उपस्थित होते.

आरक्षण उपवर्गीकरणाची (Matang Reservation Protest)  अंमलबजावणी, समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय आणि सामाजिक न्यायाच्या मागण्यांसाठी २९ सप्टेंबरचा महामोर्चा निर्णायक ठरणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या पत्रकार परिषदेचे आयोजन पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने करण्यात आले होते.

अनिल हातागळे अॅड.महेश सकट स्वागताध्यक्ष सचिव

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×