Breking News
Pune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळा

मतदान केंद्रांकडे साहित्य व कर्मचारी रवाना

मतदान केंद्रांकडे साहित्य व कर्मचारी रवाना

नव्या नियोजनानुसार थेट केंद्रांवर पोहोचविण्याची व्यवस्था

marathinews24.com

बारामती – बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या (दि. २३) मतदान होणार असून, त्यासाठी आवश्यक मतदान साहित्य व कर्मचारी आज संबंधित मतदान केंद्रांकडे रवाना करण्यात आले. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम, एमआयडीसी, बारामती येथून ही प्रक्रिया सुरळीत पार पडली.

राज्यात धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत १०१.७७ टीएमसी अधिकचा पाणीसाठा -सविस्तर बातमी 

या अंतर्गत ४७८ मतदान केंद्रांसाठी ४७८ ईव्हीएम, ९५६ बॅलेट युनिट्स तसेच ४७८ व्हीव्हीपॅट यंत्रे ६० बंदिस्त मिनी टेम्पोद्वारे क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरक्षितपणे मतदान केंद्रांवर पोहोचविण्यात आली.

यंदा निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वितरण प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्निल रावडे यांनी सांगितले की, यापूर्वीप्रमाणे मतदान पथकांना डिस्पॅच सेंटरवर न बोलावता थेट त्यांच्या संबंधित मतदान केंद्रांवर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ईव्हीएम यंत्रांसह लिफाफे, फॉर्म्स आणि इतर आवश्यक साहित्य थेट मतदान केंद्रांवर पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

यासाठी संपूर्ण मतदारसंघ ६० झोनमध्ये विभागण्यात आला असून प्रत्येक झोनसाठी एक क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. एकूण ६० क्षेत्रीय अधिकारी असून प्रत्येक अधिकाऱ्याकडे सुमारे ८ ते १० मतदान केंद्रांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र कंटेनरची व्यवस्था करून त्याद्वारे ईव्हीएम यंत्रांची सुरक्षित वाहतूक केली जात आहे.
मतदानासाठी जाणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी ज्यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही, त्यांच्यासाठी ये-जा करण्यासाठी ३० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

उद्या सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीतील आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×