Breking News
सुनावणी प्रक्रियेत दस्तऐवजीकरणाला प्राधान्य द्या : शीतल तेलीप्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख कार्याच्या आधारे जनतेचा विश्वास संपादन करा-राज्यपाल जिष्णु देव वर्माआदिवासी आश्रमशाळांमध्ये सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान राबविण्याचा निर्णयराज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना ‘संसदरत्न’ पुरस्कारगणेशमूर्ती कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या ३०० पर्यावरण मूर्तीमेट्रोची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; जिल्हा परिषद शाळांची प्रत्यक्ष पाहणी करा : डॉ. नीलम गोऱ्हेतब्बल १०० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे; सराईत चोर जेरबंदशेअरमध्ये गुंतवणूकीच्या नावाखालीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र बनावे – राज्यपाल जिष्णु देव वर्माटेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

भक्त प्रल्हादराय आणि श्री राघवेंद्र स्वामी यांची भेट

भक्त प्रल्हादराय आणि श्री राघवेंद्र स्वामी यांची भेट

श्री राघवेंद्र स्वामी यांच्या ३५४ व्या आराधना महोत्सवाची रथोत्सवाने सांगता

marathinews24.com

पुणे – भक्त प्रल्हादराय आणि श्री राघवेंद्र स्वामी यांची भेट – नंजनगुडू श्री वरदेंद्र श्री राघवेंद्र स्वामी मठातर्फे श्री राघवेंद्र स्वामी यांच्या ३५४ व्या आराधना महोत्सवाची दि. १२ ऑगस्टला भव्य रथोत्सवाने भक्तीमय वातावरणात सांगता झाली. महोत्सव दि. १० ते १२ ऑगस्ट या कालावधीत सदाशिव पेठेतील लक्ष्मी रस्त्यावरील श्री वरदेंद्र श्री राघवेंद्र स्वामी मठ येथे आयोजित करण्यात आला होता. श्री राघवेंद्र स्वामी महासंस्थानचे मंत्रालय (आंध्रप्रदेश) पिठाधीश्वर श्री श्री १०८ श्री सुबुधेंद्रतीर्थ श्रीपादा: पिठाधीपतिगलू नंजनगुडू यांच्या शुभ आशीर्वादाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

जामिनदारांच्या अटी शिथिल, शासन हमीस पाच वर्षे मुदतवाढ – सविस्तर बातमी 

रथोत्सवाला श्री वरदेंद्र श्री राघवेंद्र स्वामी मठापासून सुरुवात झाली. लक्ष्मी रस्त्याने हा रथोत्सव असंख्य भाविकांच्या उपस्थितीत नगरकर तालिम चौकातून शनिपाराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील लिंबाजी महाराज विठ्ठल मंदिरात आला. येथे श्री राघवेंद्र स्वामी आणि भक्त प्रल्हादराय यांची भेट झाली. रथोत्सव कुमठेकर रस्त्याने मार्गस्थ होत खालकर मारुती येथे आला. येथे महाआरती होऊन रथोत्सवाची सांगता झाली. आकर्षक फुलांनी रथ सजविण्यात आला होता. सजावटीसाठी फुले बंगळुरू येथून आणण्यात आली होती. रथोत्सवापुढे भाविकांनी भक्तीगीतांवर ताल धरत ‘गोविंदा गोविंदा..’ असा जयघोष केला. तीन दिवसीय उत्सवानिमित्त सुप्रभात सेवा, दुग्धाभिषेक, अलंकार, महामंगल आरती, अन्नदान सेवा, पारायण आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती मठाचे व्यवस्थापक दत्तात्रय जोशी यांनी सांगितली. यानिमित्ताने मठातील वृंदावनास फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×