Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

मराठा उद्योगजक असोसिएशनच्या बिझनेस एक्स्पोला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सदिच्छा भेट

मराठा उद्योगजक असोसिएशनच्या बिझनेस एक्स्पोला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची सदिच्छा भेट

विविध स्टॉलना भेट देत उत्पादन व निर्मिती क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रमांची घेतली माहिती

marathinews24.com

पुणे – मराठा उद्योगजक असोसिएशनच्या वतीने आयोजित बिझनेस एक्स्पोला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. मराठा समाजातील युवकांना उद्योग क्षेत्रात सक्षम व आत्मनिर्भर बनविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मंत्री विखे पाटील यांनी एक्स्पोमधील विविध स्टॉलना भेट देत उत्पादन व निर्मिती क्षेत्रातील नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेतली.

एमईए इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो २०२६ चे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून कौतुक – सविस्तर बातमी 

नव्या तंत्रज्ञानाचा वापर, स्टार्टअप्सच्या कल्पना तसेच बाजारपेठेतील संधी यांचा त्यांनी आढावा घेतला. उद्योजकांनी सादर केलेल्या नवकल्पनांचे कौतुक करून अशा उपक्रमांमुळे उद्योग क्षेत्राला चालना मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. एक्स्पोला उद्योजकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रासाठी निर्माण होत असलेल्या सकारात्मक वातावरणाचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. उद्योगस्नेही धोरणे, गुंतवणुकीस पोषक वातावरण आणि पायाभूत सुविधांना दिलेले प्राधान्य यामुळे महाराष्ट्र राज्य उद्योग गुंतवणुकीसाठी महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून उदयास येत असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मराठा समाजातील युवकांनी नोकरी शोधणारे न राहता नोकरी देणारे बनावे, हा काळाचा संदेश असल्याचे सांगून कौशल्य विकास, उद्योगासाठी आवश्यक भांडवल व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सारथी संस्थेच्या माध्यमातून युवकांना शिक्षण, प्रशिक्षण व उद्योग मार्गदर्शन दिले जात असून औद्योगिक व सेवा क्षेत्रासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्याच्या दृष्टीने उद्योजक संघटनांशी समन्वय ठेवून प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याच्या सूचना नुकत्याच झालेल्या बैठकीत दिल्याची माहितीही त्यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×