Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

‘पुणे ग्रँड टूर २०२६’ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ३५ देशांच्या सहभागाला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची मान्यता

पुणे ग्रँड टूर २०२६ ला परराष्ट्र मंत्रालयाचा हिरवा झेंडा

marathinews24.com

पुणे – पुणे येथे १९ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘पुणे ग्रँड टूर २०२६’ साठी ३५ देशांच्या प्रतिनिधींच्या सहभागाला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून तत्त्वत: ना हरकत देण्यात आली आहे.

‌‘गुरुवर्य आबासाहेब अत्रे पुरस्कार’ डॉ. अ. ल. देशमुख यांना; ‌‘इंदिरा अत्रे पुरस्कार‌’ संजय भैलुमे, विनया देसाई यांना जाहीर – सविस्तर बातमी

प्रशासनाने पुढाकार घेत सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सीएफआय) यांच्या माध्यमातून या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेला आंतरराष्ट्रीय सायकल संघटना अर्थात युसीआय युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनलची (युसीआय) मान्यता मिळाली असून त्यांच्या दैनंदिनीत समाविष्ट करण्यात आली आहे.

या स्पर्धेत भारतासह अल्बानिआ, अल्जेरिया, अमेरिकन समोआ, ऑस्ट्रेलिया, बहारिन, बल्गेरिया, बुर्किना फासो, चीन, झेक रिपब्लिक, इस्टोनिया, फ्रान्स, जर्मनी, गुआम, हाँगकाँग, इंडोनेशिया, इटली, जपान, रिपब्लिक ऑफ कोरिया, मलेशिया, मालदीव्ज, मंगोलिया, मोरोक्को, नेदरलँड्स, नायजेरिया, फिलीपीन्स, सौदी अरेबिया, श्रीलंका, स्वीडन, स्वीत्झर्लंड, थायलंड, युनायटेड अरब एमिरातस्, युनायटेड किंग्डम, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशांच्या नामांकन केलेल्या खेळाडू, प्रतिनिधींच्या सहभागाला तत्त्वत: ना हरकत देण्यात आली आहे. याबाबतचे पत्र परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांडून सायकलिस्ट फेडरेशन ऑफ इंडियाच्या महासचिवांना देण्यात आले आहे.

आयोजकांकडील निमंत्रण पत्र, व्हिजा विषयक नियमांचे पालन आणि आवश्यक तेथे संबंधित यंत्रणांच्याकडून मान्यता मिळण्याच्या अधीन राहून ही मान्यता देण्यात आली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने तत्त्वत: ना- हरकत दिल्याने स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकलपटूंचा सहभाग वाढेल आणि उत्तम सायकलपटूंचे कौशल्य पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×