Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

अल्पवयीन मुलीवर अत्याचारानंतर हत्या; पुणे जिल्ह्यातील पिंपळवंडी गावातील घटना

अल्पवयीन मुलीवर अत्याचारानंतर हत्या; पुणे जिल्ह्यातील पिंपळवंडी गावातील घटना

पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल घटनास्थळी; आरोपीला कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन

marathinews24.com

पुणे – अल्पवयीन मुलीवर अत्याचारानंतर तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना पिंपळवंडी) ( ता. जुन्नर, जि. पुणे) येथे १८ ऑगस्टला घडली आहे. दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास साडेनऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर नराधमाने उसाच्या शेतात नेऊन अत्याचार केला. त्यानंतर तिची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी धाव घेतली. गावकऱ्यांसोबत चर्चा करून आरोपीला कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन दिले आहे.

पुण्यातील बालसुधारगृहातून पळालेला अल्पवयीन ताब्यात – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ९ वर्षीय मुलगी १८ ऑगस्टला दुपारी साडे तीन वाजता रस्त्याने पायी जात होती. त्यावेळी परिसरात दुचाकीवरून आलेल्या आरिपीने तिला गाडीवर बसवून जवळच्या उसाच्या शेतात नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा दाबून हत्या केली. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे मिसिंगची तक्रार नोंदवली. त्यानंतर तपासादरम्यान ही गंभीर घटना समोर आली. संबंधित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक घटनास्थळी उपस्थित राहून तपासाचा आढावा घेतला. विविध तपास यंत्रणा कामाला लावण्यात आल्या असून, प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या घटनेने संपूर्ण पिंपळवंडी परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. “अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा जीव घेणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. तपास जलदगतीने पूर्ण करून पीडितेला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी पिंपळवंडी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाकडे आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, या प्रकरणाचा लवकर छडा लावून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×